आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात दंगलीमागे नरेंद्र मोदीच; मुलायमसिंह म्हणाले, \'मुस्लिमांची माफी मागा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादव यांनी रविवारी येथील परेड मैदानावर आयोजित देश बचाओ, देश बनाओ रॅलीला संबोधीत करताना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर गुजरातमध्ये मुस्लिमांची हत्या केल्याचा आरोप केला. मोदींवर हल्ला करताना ते म्हणाले, मोदींनी देशातील मुस्लिमांची माफी मागितली पाहिजे. त्यांचा खोटारडेपणा उत्तरप्रदेशात चालणार नाही.
भारतीय जनता पक्ष मुस्लिमांना मूर्ख समजते का, असा सवाल करीत त्यांनी काँग्रेस आणि भाजप एकत्र असल्याचा आरोप केला. राजनाथसिंह यांच्या माफीनाम्यावर ते म्हणाले, लोक दिवसाढवळ्या हत्या करून माफी मागण्याची भाषा करीत आहेत.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, नगविकास मंत्री आझम खान यांनी सरकारच्या योजनांचा आणि त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाचा पाढा वाचला. ते म्हणाले, आम्ही जनतेचा पैसा जनतेला परत दिला आहे.
गुजरातच्या विकासाची पोलखोल
मुलायमसिंह म्हणाले, देशात बालके आणि महिलांची सर्वाधिक वाइट अवस्था गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील नद्यांचे नाले झाले आहेत.
मुलायमसिंहांनी मोदींवर कच्छमध्ये शीखांची जमीन बळकावल्याचा आरोप केला.