आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यांनी अमरसिंह यांच्यासाठी सोडली खुर्ची, समाजवादीत जाण्याची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरसिंग यांचा हात धरुन त्यांना जवळ बसवताना मुलायमसिंग यादव. - Divya Marathi
अमरसिंग यांचा हात धरुन त्यांना जवळ बसवताना मुलायमसिंग यादव.
लखनौ - समाजवादी पक्षातून (सप) हकालपट्टी करण्‍यात आलेल्या अमरसिंह यांची पक्षात घरवापसीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. आज (गुरुवारी) लखनौमधील एका कार्यक्रमात सप प्रमुख मुलायमसिंह यादव आणि अमरसिंह यांच्या दरम्यान ब-याच वर्षांनंतर पूर्वीसारखी जवळीक दिसली.
या कार्यक्रमात खेळीमेळीचे वातावरण होते. अमरसिंह काय लिहायचे तर मुख्‍यमंत्री अखिलेश यादव हे कागद हिसकावून घ्‍यायचे. या घटनेने उपस्थितींमध्‍ये हशा पिकला होता. बहुतेक कार्यक्रमात अखिलेश हे मुलायमसिंह यादवांच्या जवळ बसत. मात्र आज त्यांनी अम‍रसिंह यांच्यासाठी आपली खुर्ची सोडली. या कार्यक्रमात लखनौच्या अन्सल गोल्फी सिटीत मेदांत अवध हॉस्पिटलची पायाभरणी झाली.
काय आहेत तर्क?
- सपाचे नेते आझम खान उत्तर प्रदेश सरकारच्या प्रत्येक कार्यक्रमात असतात. ते मुख्‍यमंत्र्यांबरोबरही असतात. परंतु गुरुवारच्या कार्यक्रमात ते आले नाहीत. खान आणि अमरसिंह यांच्या दरम्यान चांगले संबंध नाहीत.
- दादरी प्रकरणी आझम खान यांनी संयुक्त राष्‍ट्रात(यूएन) जाण्‍याची धमकी दिली होती. मात्र अखिलेश यादव यांनी यूएनमध्‍ये जाणार नसल्याचे स्पष्‍ट सांगितले.
सपतून अमरसिंह यांची हकालपट्टी का करण्‍यात आली?
- 2007 मध्‍ये सपच्या पराभवासाठी पक्षाचे वरिष्‍ठ नेते अमरसिंह यांना जबाबदार धरण्‍यात आले होते.
- अमरसिंह यांच्याविरोधात आझम खान यांच्या व्यतिरिक्त रामगोपाल यादव आणि मोहनसिंग यांनी विरोध नोंदवला होता.
- आजारी असल्याने अमरसिंह हे सिंगापूरला उपचारासाठी गेले होते. 2009 मध्‍ये दुरावा प्रचंड वाढल्याने त्यांनी सिंगापूरमध्‍येच सपच्या सर्व पदांचा राजीनाम देऊन टाकला होता. अमरसिंह यांचा आरोप होता, की त्यांना हॉस्पिटलमध्‍ये पाहायला यादव कुटूंबातून कोणीही आले नव्हते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, समाजवादी पक्षात जाण्याबाबत काय म्हणाले अमरसिंह....