आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार पुरुष महिलेवर बलात्कार करूच शकत नाहीत, मुलायमसिंह यादव यांचे वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - एक पुरुष बलात्कार करतो, पण त्याचा बदला घेण्यासाठी चार जणांना गोवले जाते. चार पुरुष महिलेवर बलात्कार करूच शकत नाहीत, असेवक्तव्य समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी केले आहे. एका समारंभात ते म्हणाले, ‘फक्त एक व्यक्ती बलात्कार करते, पण त्याचा बदला घेण्यासाठी पीडिता चार जणांची नावे गोवते, अशा घटना घडल्या आहेत. निरपराधांना गोवले जाऊ नये तसेच त्यांना त्रास दिला जाऊ नये. चार भावांनी आपल्यावर बलात्कार केला, असे आरोप पीडितेने केल्याच्या अनेक घटना आहेत. ते अशक्यच आहे.’
आपला मुद्दा पटवून देण्यासाठी मुलायम यांनी बदायूं जिल्ह्यातील दोन चुलत बहिणींवरील कथित बलात्कार आणि खून प्रकरणाचा उल्लेख केला. ‘सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली असता बलात्कारच झाला नव्हता, त्यांच्या चुलत भावांनीच मालमत्तेच्या वादातून त्यांची हत्या केली होती, असे चौकशीत स्पष्ट झाले होते. मात्र घटनेनंतर वस्तुस्थिती जाणून न घेताच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तेथे पोहोचले आणि त्यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती,’ असे मुलायम म्हणाले. उत्तर प्रदेशच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता, गुन्हेगारीचा दर अत्यंत कमी आहे, असा दावाही त्यांनी केला.

पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या, मुलायमसिंह यादव यांचे या आधीचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य..