आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपाच्या पराभवास मीडिया, मतदार जबाबदार: मुलायमसिंग यादव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पार्टीच्या उत्तर प्रदेशातील पराभवाला प्रसारमाध्यमे आणि मतदार जबाबदार आहेत, असे मुलायमसिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुलायम यांनी राज्यातील जनतेच्या अकलेवर प्रश्नचिन्ह लावले आहे, असे भाजपने म्हटले आहे.  
 
निवडणुकीदरम्यान प्रसारमाध्यमांनी यादव कुटुंबातील भांडणावर अधिक भर दिला होता. त्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करण्यात आले, असा दावा मुलायम यांनी केला. अखिलेश यादव यांनी अतिशय चांगले काम केले असतानाही जनतेने त्यांच्या पदरात पराभव टाकला. माध्यमांनी दिशाभूल केली आणि मतदार भाजपसोबत गेले. निवडणुकीत माध्यमांनी यादव कुटुंबातील कलहाएेवजी अखिलेश सरकारने केलेल्या कामावर लक्ष केंद्रित केले असते तर कदाचित निकाल वेगळा असता, असे मुलायम यांनी सांगितले. मुलायम यांनी मतदारांवर पराभवाचे खापर फोडले आहे.

त्यातून ते जनतेच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह लावू पाहत आहेत, असे भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी म्हटले आहे. वास्तविक उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपच्या बाजूने बहुमत दिले. आता त्यांच्या बुद्धीवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे ठरेल. २०१९ मध्येदेखील सपाला जनता सत्ता देणार नाही. त्यांना सध्या संधी मिळणे कठीण आहे, असा दावा शुक्ला यांनी केला.  नेतृत्व बदल करण्यात आले. माझ्या दृष्टीने पक्षाचे प्रमुखपद हे अर्थहीन आहे, मुलायम यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...