आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayamsingh Yadav Elected As Chairman Of Samajwadi Party, Divya Marathi

मुलायमसिंह यादव यांची समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी नवव्यांदा निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मुलायमसिंह यादव यांची समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नवव्यांदा अविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या तीनदिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी मुलायम यांनी केंद्र सरकार व नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत जे गरजतात, ते बरसत नसल्याचे ते म्हणाले.

जनेश्वर मिश्र पार्कमध्ये आयोजित अधिवेशनात मुलायम म्हणाले, लोकांचा विसर व्हावयास नको, त्यांच्याशी जोडले जा. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या ८० पैकी ७३ जागांवर भाजप व त्यांचा सहकारी पक्ष जिंकून आला. सपाला केवळ पाच जागा जिंकता आल्या. या जागांवर कुटुंबातील उमेदवार उभे होते. लोकांचा आमच्या कुटुंबावर विश्वास आहे. कमीत कमी आपल्या कुटुंबावर विश्वास आहे, तेच आपले संरक्षण आहे.