आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayamsingh Yadav News In Marathi, Uttar Pradesh Politics, Samajwadi Party

निवडणुका आल्या, आता तरी सुधारा; मुलायमसिंह यांची नोकरशहांना कानपिचक्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - राज्यात उसळलेल्या दंगली, प्रशासनाची ढिली झालेली पकड आणि सपा नेत्यांचे पुत्र, कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीमुळे वैतागलेले सपा प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता तरी सुधारा, अशी तंबी देत 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. याबरोबर त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही चापलुसी करणार्‍यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.


मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित मेळाव्यात मुलायम यांनी मंत्री आझम खान यांच्याकडे इशारा करत, तुमच्या सरकारमध्ये चापलुसी करणार्‍यांनी पाय पसरले आहेत, असे सांगितले. सरकार आपल्या कामगिरीतून पक्षाला कमकुवत करत आहे. मंत्री आणि अधिकार्‍यांनी आपल्यात दहा दिवसांमध्ये सुधारणा कराव्यात. पुत्र अखिलेश यांना उद्देशून, तुम्ही स्तुतिपाठकांपासून सावध राहा असा सल्ला दिला. तुम्हाला सर म्हणणे ऐकून घ्यावयाची सवय जडली आहे. यामुळे हुजरेगिरी करणार्‍यांचे फावते, त्यामुळे असे होऊ नये. सरकारने रस्ते, वीज आणि पाणी प्रकल्प योजनेच्या फायली तत्काळ निकाली काढायला पाहिजेत. मी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला नाही, मात्र ते काय काम करतात हे मला माहीत आहे. मंत्री आणि नोकरशहांनी आपल्या कामात 10 दिवसांमध्ये सुधारणा करावी, असे मुलायम म्हणाले. सरकारपेक्षाही पक्ष मोठा आहे. सरकार पक्षाला कमकुवत बनवत आहे. काही जण माझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करत असून आपण मंत्रिपदी कायम राहू असे त्यांना वाटत आहे. अखिलेश यांना उद्देशून बोलत असताना आझम खान यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार सपा प्रमुखांच्या दिशानिर्देशावरच चालत असल्याचे खान म्हणाले.