आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्स अॅपवर फोटो पाहून फिक्स होत होता रेट, मुंबईहून येत होत्या कॉलगर्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉट्सअॅपवर फोटो पाहून ठरत होता रेट. - Divya Marathi
व्हॉट्सअॅपवर फोटो पाहून ठरत होता रेट.
राजसमंद (राजस्थान) - येथील एका हॉटेलमध्ये कॉलगर्ल पुरवल्या जात असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनंतर छापेमारी करण्यात आली, त्यात अनेक खळबळजनक खुलासे झाले. शहरातील कस्टमर हेरून त्यांना कॉलगर्लचे फोटो व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून पाठवले जात होते, आणि त्यानतंर मुंबईहून मुलींना बोलवले जात होते. पोलिसांच्या छापेमारीत मुंबईच्या दोन मुली, दोन महिला आणि दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. यात एक विवाहिता आहे.

मुंबईतून चालत होते रॅकेट
- चौकशीत दलालांनी सांगितले, की मुंबईहून कॉलगर्ल बोलवल्या जात होत्या. आधी त्यांचे फोटो व्हॉट्स अॅपवर मागवे जात होते.
- राजसमंदमध्ये कस्टमर हेरून त्यांना व्हॉट्स अॅपवर मुलींचे फोटो पाठवले जात. पसंत आलेल्या मुलीचा रेट व्हॉट्स अपवरच निश्चित होत होता. त्यानंतर मुलींना मुंबईहून राजसमंद येथे बोलावून घेत होतो.
- दलालाने सांगितले, की एका कस्टमरमागे आम्हाला दोन हजार रुपये मिळत होते. तर, कॉल गर्लला एका दिवसासाठी 10 हजार रुपये देत होतो.
- सोमवारी रात्री कॉलगर्ल मुंबईहून राजसमंद येथे पोहोचल्या होत्या. त्यांना सहा दिवसांचे 60 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

कसे पकडले रॅकेट
- पोलिसांना अनेक दिवसांपासून शहरातील एक हॉटेल आणि एका घरात सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची बातमी मिळाली होती.
- या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरु केली तर यात मुंबई कनेक्शन असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
- मंगळवारी दुपारी पोलिसांनी ट्रॅप लावला. एक बोगस ग्राहक तयार करुन पोलिसांनी त्याला हॉटेलमध्ये पाठवले.
- बाहेर डीएसपी माधुरी यांच्यासह विशेष शाखेचे जवान दबा धरुन बसलेले होते. आत गेलेल्या बनावट ग्राहकाने इशारा केल्याबरोबर डीएसपी माधुरी यांच्यासह पथकाने हॉटेलवर धाड टाकली.
- या छापेमारीत दोन दलाल, हे दोघे मामा-भाचे आहेत, यांना अटक केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, एका विवाहितेसह किती जणांना झाली अटक...
बातम्या आणखी आहेत...