आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्‍यापकाचे निलंबन झाले तरी सुरळीत चालू आहेत रस्‍त्‍यावर क्‍लास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई विद्यापीठाचे प्रपाठक डॉ. नीरज हातेकर यांच्‍यावर विद्यापीठाने तडका-फडकी कारवाई केल्‍यानंतर, घरी न बसता या अर्थशास्‍त्राच्‍या प्राध्‍यापकाने विद्यार्थ्‍यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली आहे. या विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यासक्रम पुर्ण करण्‍यासाठी डॉ. हातेकरांनी चक्‍क रस्‍त्‍यावर ज्ञान दानाचे कार्य सुरू केले आहे. आपला अर्थशास्‍त्राचा विषय कच्‍चा राहणार नाही, यासाठी रस्‍त्‍यावर बसून विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर यांच्‍यावर टिका केल्‍यामुळे हतेकर यांना चार जानेवरीला निलंबीत करण्यात आले होते.

पुढील स्‍लाईडवर वाचा रस्‍त्‍यावरील क्‍लास बद्दल......