आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munavvar Ranas Poem On Sonia Creates Controversy

सोनियांवरील कवितेमुळे मुनव्वर राणांवर आरोप, भाजप नेत्याने उघड केली कविता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा त्यांच्या एका कवितेवरून वादात अडकले आहेत. भाजपच्या मध्य प्रदेश युनिटच्या एका नेत्यांनी मुनव्वर यांची ही कविता सोशल मीडियावर अपलोड केली आहे. त्यांनी सोनिया गांधींचे कौतुक करण्यासाठी ही कविता लिहिली होती, असे सांगण्यात येत आहे. याच कवितेच्या माध्यमातून राणा हे काँग्रेसधार्जिणे असल्याचा आरोप भाजप करत आहे. मुनव्वर हालांकि, मुनव्वर यांनी हे आरोप फेटाळला आहे. आपला प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दादरी सारख्या घटनांच्या विरोधासाठी रविवारी सायंकाळी एका टिव्ही कार्यक्रमात राणा यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला.

मुनव्वर यांच्यावरील आरोप...
सोनियांवर लिहिलेल्या कवितेच्या माध्यमातून मुनव्वर यांच्यावर राजकीय पक्षपाताचा आरोप करण्यात येत आहे. व्हॉट्स अॅपवर राणा यांची कविचा शेअर करणारे भाजपचे मिडिया इन्चार्ज हितेश वाजपेयी म्हणाले की, माझ्याकडे कुठून तरी ही कविता आली ती मी फॉरवर्ड केली. मुनव्वर एका पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुनव्वर यांचे स्पष्टीकरण...
मुनव्वर या मुद्यावर म्हणाले की, मी केवळ सोनिया गांधींवरच नव्हे तर तरुण विजय यांच्यावरही लेख लिहिला आहे. लाल कृष्ण अडवाणी यांच्याबरोबर यात्रेदरम्यान सिंधू नदीवरही कविता लिहिली होती. मी आजवर सोनियांना भेटलेलो नाही. सोनियांचे सचिव अहमद पटेल यांनी मला भेटायला सांगितले होते. त्यावर मी म्हणालो होतो की, सोनियांना रोज 150 लोक भेटत असतील. मला 151 वा व्यक्ती बनायचे नाही. सोनिया मला भेटायला आल्या तर ठीक असे मी सांगितले होते. कोणत्याही पक्षाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे.
पुढील स्लाइड्वर व्हाट्स अपवर शेअर करण्यात आलेली कविता...