आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munmun Sen Speaks On Tapas Pal Controversy, Latest News In Marathi

कोणावरही बलात्कार करणे इतके सोपे नाही; मुनमुन सेन यांचा तपस पाल यांना घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- तृणमूल कॉंग्रेसचे खासदार तपस पाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरु झालेल्या वादात आता खासदार आणि अभिनेत्री मुनमुन सेन यांनी उडी घेतली आहे. कोणावर बलात्कार करणे इतके सोपे नसल्याचे सांगून मुनमुन सेन यांनी तपस पाल यांना घरचा आहेर दिला आहे.

एक महिला असल्याच्या नात्याने तपस पाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुळीच पांघरून घालणार नसल्याचेही मुनमुन सेन यांनी सांगितले. तपस पाल यांचे वादग्रस्त वक्तव्य एखाद्या सिनेमातील हाणामारीच्या सिनचा संवाद होऊ शकतो. पाल यांच्यासारखे जबाबदार लोकप्रतिनिधी असे बेताल वक्तव्य करूच कसे शकतात, असा सवालही मुनमुन सेन यांनी उपस्थित केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी नेहमी शांतता आणि सद्‍भावना ठेवण्याबाबत आग्रह धरतात. समाजाला चिथावणारे वक्तव त्या कदापी खपवून घेणार नसल्याचेही मुनमुन सेन यांनी यावेळी सांगितले.
पश्चिम बंगलमधील सगळ्या महिला सुरक्षित...
'बैदुर्य रहस्‍य' सिनेमात मुनमुन सेन यांनी तपस पाल यांच्यासोबत काम केले आहे. मुनमुन म्हणाल्या, 'पश्चिम बंगालमधील महिलांनी घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. कोणावर बलात्कार करणे सोपी गोष्ट नाही. राज्यातील सगळ्या महिला सुरक्षित आहे.
काय आहे प्रकरण...
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार तपस पाल यांनी एका भाषणात माक्सवादी कम्युनिस्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना बलात्कार आणि त्यांची हत्या करण्याची धमकी दिली होती। त्यानंतर तपस पाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चौफेर टीका झाला. केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.
यानंतर तपस यांच्या पत्नीने माफीही मागितली होती.

(फाइल फोटोः पश्चिम बंगालमधील एका प्रचार सभेत तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांच्यासोबत अभिनेत्री मुनमुन सेन)

पुढील स्लाइडवर पाहा, खासदार तपस पाल यांच्या वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ