आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भाजप मुस्लिमविरोधी नाही, योजना आणणार’, मुख्तार अब्बास नक्वी यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामपूर - भारतीय जनता पक्ष हा मुस्लिमविरोधी पक्ष नसून मुस्लिमांची आणखी आरक्षणाची मागणी घटनाबाह्य असल्याचे मत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे.
 
आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही लोक भाजपला मुस्लिमविरोधी ठरवत असल्याचा कट मुस्लिम जनतेने ओळखून घेतल्याचा उल्लेखही त्यांनी उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केला. ते म्हणाले, सरकारने मागासवर्गीयांसाठी काही योजना आणल्या आहेत. मात्र, त्याचा फायदा मुस्लिम जनता घेऊ शकत नाही, असे होत नाही. कारण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम जनता मागासवर्गीय गटात मोडते.
 
विकासात्मक योजनांचा मोठा वाटा मुस्लिमांना मिळणार आहे. देशातील १३ राज्यांमध्ये भाजपने सुशासनाच्या नावावर सत्ता मिळवली आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधानांचे विदेशी धोरण आणि लोककल्याणासाठीच्या योजनांनी देशासोबतच विदेशातही देशाचे नावलौकिक केला असल्याचेही ते म्हणाले. भाजप मुस्लिमविरोधी असल्याचा प्रचार विरोधकांकडून सातत्याने केला जातो. त्या पार्श्वभूमीवर नक्वी यांनी ही भूमिका मांडली.
 
ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप जनादेशाचा अपमान
नक्वीपुढे म्हणाले, बसपा, सपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी पक्षांकडून मतदान यंत्रांच्या घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. मात्र, याच पक्षांनी याच मतदान यंत्रांच्या माध्यमातून अनेकदा सत्ता मिळवलेली आहे. ईव्हीएममध्ये हेराफेरी केल्याचा आरोप लावणे म्हणजे जनादेशाचा अपमान होय. ईव्हीएमच्या जागी अशा विरोधकांनी आपल्या उणिवा शोधायला हव्यात.
बातम्या आणखी आहेत...