कोलकाता - छंद कोणताही असो, तो मनातून जोपासला तर त्यातून आत्मिक समाधान तर मिळतेच, शिवाय जगण्याची नवी उमेद मनात जागत राहते. मुरारी आदित्य हा असाच एक जिद्दी इसम. सर्वांत लांब नखे वाढविण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित करणा-या ७२ वर्षीय आदित्य यांचा डावा हात आता याच नखांमुळे अशक्त व निकामी झाला आहे. मात्र, या उतारवयातही ते नखे कापायचीच नाहीत, या निर्धारावर ठाम आहेत.
१८० इंच नखे वाढवून नोंदवला होता विक्रम.
अजूनही १२० इंची नखे राखण्याची जिद्द
नखांनी मला खूप काही दिले आहे. ती मी कशी कापेन? नखांशिवाय जगणे आता मला अधुरे वाटते.
- मुरारी आदित्य.
१९८२ मध्ये विक्रम प्रस्थापित
१९८२ मध्ये आदित्य यांच्या नखांची गिनीज बुकमध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली होती. नंतर काही कारणास्तव त्यांना ही नखे कापावी लागली.
आपल्या नखांची लांबी वाढवून नवा जागतिक विक्रम नोंदवला जाऊ शकणार नाही, हे माहीत असूनही त्यांनी १९८६ मध्ये पुन्हा नखे वाढवण्यास सुरुवात केली.
७२ वर्षीय आदित्य यांची उतारवयातही नखे कापण्याची इच्छा नाही.