आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वराची मांडवातच गोळ्या घालून हत्या; तिघांना चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरा- जगदीशपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पिलापूर गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर विवाहमंडपातच वराची गोळ्या घालून हत्या करण्याची चित्रपटात शोभेल अशी थरारक घटना प्रत्यक्षात घडली. पाठीत गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या वरास तातडीने दवाखान्यात नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. खुनाचे कारण समजू शकले नाही.   

मृत्युमुखी पडलेला नियोजित वर सुधीर हा भोजपूरजवळील उत्तरदाहा गावात राहणाऱ्या वृंदानंद महतो यांचा मुलगा होता. मुलाकडची वरात उत्तरदाहा येथून पिलापूर येथील सुदेश्वरसिंह कुशवाह यांच्याकडे आली होती. वधूला पुष्पहार घातल्यानंतर वर कारमध्ये बसण्यास जात होता. यादरम्यान, तीन हल्लेखोर तेथे आले. या प्रकरणी उत्तरदाहा येथील तीन लोकांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करण्यात येत आहे. वराला गोळ्या घालणारे आरोपी वरातीमध्येच सहभागी झालेले होते. जगदीशपूर येथील पोलिस ठाणे प्रभारी बी. एन. चौधरी यांनी सांगितले : विवाह मंडपापासून सुमारे १५० मीटर अंतरावर थोडा अंधार होता. तेथून वराच्या पाठीवर कोणीतरी गोळ्या झाडल्या असाव्यात.
बातम्या आणखी आहेत...