आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या ऑटोत युवतीची गोळ्या घालून हत्या; प्रियकर संशयाच्या भोवर्‍यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- मध्य प्रदेशातील इंदूर येथून बिहारमधील पाटण्यात आलेल्या एका युवतीची निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली आहे. युवतीवर धावत्या ऑटो ‍रिक्षात गोळ्या घालण्यात आल्या. शहरातील जक्कनपूर भागात ही घटना घडली. सृष्टी जैन (23) असे मृत युवतीचे नाव असून प्रियकराला भेटण्यासाठी ती आली होती. यावरून तिचा प्रियकर संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

रजनीश व सृष्टीत झाले होते कडाक्याचे भांडण...
- इंदूर येथील रहिवासी सृष्‍टी जैन 23 जानेवारीला पाटण्यात आली होती. ती प्रियकराला भेटण्यासाठी आर्ली होती. एक हॉटेलमध्ये ती थांबली होती.
- सृष्टी व तिचा प्रियकर रजनीशमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. रजनीशने सृष्टीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती.
- मात्र, सृष्टीने त्याला रुपये देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. सोमवारी रात्री सृष्टी 10.30 वाजता ऑटोने स्टेशनकडे निघाली.
- रजनीश व त्याचे मित्र बाइकने तिचा पाठलाग करत होते.
- रजनीशने सृष्टीवर चार गोळ्या घातल्याचा आरोप करण्‍यात येत आहे.

सृष्टी थांबली होती त्याच हॉटेलमध्ये थांबला होता रजनीश
- सृष्‍टी ही इंदूरमधील खैरा तांडा येथील रहिवाशी सुशील जैन यांची कन्या होती.
- सृष्‍टी जक्कनपूर भागातील मनी इंटरनॅशनल हॉटेलच्या रूम नंबर 105 मध्ये थांबली होती.
- याच हॉटेलच्या रूम नंबर 106 मध्ये सृष्‍टीचा प्रियकर रजनीश सिंह हा मित्रासोबत थांबला होता.
- 23 जानेवारी रात्री दोघे फिरायला बाहेर पडले होते. रात्री उशीरा हॉटेलमध्ये परतले होते.
- सृष्टी 24 जानेवारीला इंदूरला जाण्यासाठी निघाली होती. परंतु तिकिट कन्फर्म न झाल्यामुळे ती परत हॉटेलमध्ये आली होती.
- मनी इंटरनॅशनलच्या रूम नंबर 103 मध्ये ती थांबली.
- सृष्टीच्या मनगटावर ‘आर’ नामक टॅटू गोंदले होते.
- इंदूरमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना प्रेमसंबंध जुळले होते.

रजनीशने सृष्‍टीला दिला होता विवाहाचा प्रस्ताव...
- सृष्टीची बहीण शगुन जैनने सांगितले की, रजनीशने काही दिवसांपूर्वी सृष्टीला विवाहाचा प्रस्ताव दिला होता.
- सृष्टीला त्याने आई-वडीलांना भेटण्यासाठी पाटण्यात बोलावले होते.
- ती रजनीशच्या आई-वडीलांनाही भेटली होती.

दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करत होती सृष्‍टी
-सृष्टी जैन ही दिल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने जॉब सोडला होता. ती इंदूर येथेच राहात होती.
- पोलिस आरोपी रजनीशला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
- रजनीश हा वैशाली जिल्ह्यातील राघोपूरमधील वीरपूर येथील राहाणारा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज् ...