आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये झोपेत असलेल्या मुलासह सून व नातीला जाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट- झोपेत असलेल्या मुलासह सून व दीड वर्षाच्या नातीला पेट्रोल टाकून जाळले. त्यानंतर स्वत: कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. आगीत होरपळल्याने मुलगा व नात मरण पावली, तर सुनेवर उपचार सुरू आहेत. 

मुलाने ट्रॅक्टर देण्यास नकार दिल्याने पिता नाराज होता. ही  घटना पंजाबातील पठाणकोट येथे घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजित आणि त्यांचा मुलगा सेवासिंग यांच्यात ट्रॅक्टरवरून वाद सुरू होता. गुरुवारी रात्रीच्या वेळी सेवा सिंग मुलगी मनकित आणि पत्नी बलजित यांच्यावर मनजित यांनी पेट्रोल टाकले आणि आग लावली, तर स्वत: एका कालव्यात उडी घेतली.

आगीत होरपळून गेलेल्या कुटुंबास शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले. तेथे मनकित व सेवासिंग यांचा मृत्यू झाला, तर बलजित ६० टक्के जळाली असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत. बलजितच्या जबाबानुसार, सासरा मनजित व त्याचा साथीदार बसनसिंग यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
बातम्या आणखी आहेत...