आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमधील 'सैराट' प्रकरण : आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
पाटणा- मुलीने खालच्या जातीतील मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केल्याच्या रागातून त्याच्या आई-वडिलांचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात दांपत्याच्या 2 मुलीही जखमी झाल्या आहेत. 
 
गच्चीवर कमल चौधरी (50) हे त्यांची पत्नी शांती देवी (45) आणि मुलींसोबत झोपले होते. हल्लेखोरांनी ही संधी साधत हल्ला केला आणि कमल चौधरी आणि शांती देवी यांचा गोळ्या घालून खून केली. हल्ल्यात कमल चौधरी यांच्या दोन्ही मुली किरण देवी (20) आणि सुश्मिता कुमारी (15 ) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाराणसीमधील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस-बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना भरती करण्यात आले आहे. 
 
ऑनर किलिंगच
हे ऑनर किलिंग प्रकरण असल्याचे स्पष्ट होत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्या किरण देवीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ धर्मेंद्र चौधरी याचे तीन महिन्यापुर्वी दुसऱ्या जातीतील मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्या दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर ते दिल्लीला जाऊन राहत होते. 
 
गावकऱ्यांनी सांगितले की, 'मुलगी उच्च घराण्यातील आहे. धर्मेंद्र खालच्या जातीतला असल्याने त्यांना त्यांचे लग्न मान्य नव्हते. मुलीचे नातेवाईक आपण याचा बदला घेऊ अशी धमकीही नेहमी देत असत'. मुलीच्या भावाची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...