आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG : भावाने केला बहिणीवर बलात्‍काराचा प्रयत्‍न, विरोध केला तर ठार मारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुरुक्षेत्र (हरियाणा) - आपले रक्षण करावे, म्‍हणून ज्‍या भावाला ती राखी बांधत होती त्‍यानेच तिच्‍यावरच अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्‍न केला. एवढेच नाही तर तिने त्‍याला विरोध केला असता क्रुरपणे चाकूने भोसकून तिचा खून केला. ही घटना शुक्रवारी घडली. पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपीला बेड्या ठोकल्‍या. मनप्रिया असे मृत मुलीचे तर गुरबाज असे आरोपीचे नाव आहे.

या आहे पूर्ण प्रकरण....
> एसपी सिमरदीप सिंह यांनी सांगितले, मनप्रिया ही इयत्‍ता दहावीत शिकत होती.
> गुरबाज हा तिचा सख्‍खा भावस भाऊ होता.
> काही दिवसांपूर्वी गुरबाज याने मनप्रियाचा अर्धनग्‍न फोटो काढला होता. त्‍यामुळे मनप्रिया याच्‍या कुटुंबीयांनी त्‍याचे घरी येणे- जाणे बंद केले होते.
> शुक्रवारी मनप्रिया घरी एकटीच असल्‍याची माहिती गुरबाजला मिळाली.
> त्‍याने तिच्‍या घरी जावून तिच्‍यावर अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्‍न केला.
> तिने त्‍याला विरोध केला असता त्‍याने तिचा खून केला.
पोलिसांना असा आला संशय
त्‍या नंतर गुरबाज हा शोक व्‍यक्‍त करण्‍यासाठी मनप्रियाच्‍या घरी गेला. तेव्‍हा पोलिसांना त्‍याच्‍या हातावर जखमा आणि गळ्यावर नखाचे ओरखडे दिसले. त्‍यांनी तिच्‍याबाबत चौकशी केली असता त्‍यांना फोटो प्रकरणाची माहिती मिळाली. त्‍या आधारे पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्‍याने आपला गुन्‍हा कबुल केला.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)