आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहादच्या नावाने हत्या करून व्हिडिअाे बनवणारा अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजसमंद- लव्ह जिहादच्या नावाने राजस्थानच्या राजसमंद शहरात ठेकेदाराची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या व या घटनेचा व्हिडिअाे बनवणाऱ्या अाराेपी शंभुलाल रेगर याला पाेलिसांनी अटक केलीय. गुरुवारी सकाळी त्यास १३वर्षीय मुलगी व १५वर्षीय भाच्यासह केळवा भागात स्कुटीवर फिरत असताना ताब्यात घेण्यात अाले. हत्येचा व्हिडिअाे भाच्याने बनवला हाेता. 


या प्रकरणातील मुलगी व भाचा या दाेघांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यात इंटरनेटची सेवा बंद करण्यात अाली अाहे. शंभुलाल याने बुधवारी लव्ह जिहाद, दहशतवाद अादी मुद्द्यांवर भाषण देत या घटनेचा व्हिडिअाे बनवून साेशल मीडियावर व्हायरल केला हाेता. त्याने तीन व्हिडिअाे हत्येच्या एक दिवसापूर्वी ५ नाेव्हेंबरला, तर दाेन व्हिडिअाे घटनेच्या दिवशी बनवले हाेते. दरम्यान, अाराेपीच्या घरात लव्ह जिहादसारखी घटना घडली की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.


व्हिडिअाेत जे सांगितले तेच हत्येचे कारण : पाेलिस
मी हत्या करून गुन्हा केलेला नाही, असे शंभुलालने सांगितले. या लाेकांनी त्याच्या भागातील मुलीला पळवून नेले हाेते. ताे तिला साेडवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला हाेता. तेव्हापासून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात हाेती. तथापि, हत्येचे कारण तेच अाहे जे व्हिडिअाेत सांगितलेय. हत्येनंतर शंभुलाल केळवा येथे बहिणीच्या घरी लपला हाेता, असे पाेलिस म्हणाले.


लहान मुलगी विक्षिप्त
अाराेपी शंभुलाल पत्नी व तीन मुलांसह राजसमंद येथे राहताे. त्याची १३ वर्षांची सर्वात लहान मुलगी विक्षिप्त अाहे. तीदेखील व्हिडिअाेत दिसतेय. शंभुलालचा व्यवसाय वर्षभरापासून ठप्प झाला हाेता. तसेच मयत अफराजूल हा शहरातच १५ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात हाेता. त्याचे भाऊ, जावई तेथेच राहतात.

बातम्या आणखी आहेत...