आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Teachear Commit Suside After Girlfriend Murder

प्रेयसी विद्यार्थिनीची हत्‍या करून शिक्षकाची रेल्‍वेखाली आत्‍महत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार (हरियाणा) - एका शासकीय शाळेतील शिक्षकाने त्‍याचीच विद्यार्थिनी असलेल्‍या आपल्‍या प्रेयसीची कारमध्‍ये हत्‍या केली. नंतर रेल्‍वेखाली जीव जीव दिला. ही घटना आदमपूर आणि जाखोडखेडा गावाच्‍या मधोमध घडली. शिक्षकाचे जसविंदर तर प्रेयसीचे मुकेश नाव आहे. जसविंदर हा संगीत शिक्षक होता तर मुकेश इयत्‍ता अकरावीमध्‍ये होती.
शिकवता शिकवता झाले प्रेम...
> जसविंदर हा गावातीलच एका शासकीय शाळेमध्‍ये संगीत शिक्षक होता.
> त्‍याचे इयत्‍ता अकरावतील एका विद्यार्थिनीवर प्रेम जडले.
> मुलीनेही त्‍याला प्रतिसाद दिला.
> त्‍याने प्रेयसीची हत्‍या करून आत्‍महत्‍या केली.
> लिसांना घटनास्‍थळावर जसविंदर याने लिहिलेली सुसाइड नोट आढळली.
> या सर्व प्रकाराला आपल्‍या प्रेयसीचा मावस भाऊ वीरेंद्र हाच जबाबदार असल्‍याचे जसविंदर याने चिठ्ठीत लिहिले.
> वीरेंद्र आपल्‍याला ब्‍लॅकमेल करत होता आणि पैसे उकळत होता. शिवाय आपल्‍या प्रेयसीसोबत गैरवर्तन करत होता, असे त्‍याने आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीत म्‍हटले.

कारमध्‍ये आढळल्‍या दोन बॅग
> पोलिसांना या कारमध्‍ये सेलफोन आणि दोन बॅग आढळून आल्‍या. बॅगमध्‍ये कपडे होते.
> कारमध्‍ये मुलीचा खून झाला त्‍यात मोठ्या प्रमाणात रक्‍त पडले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चिठ्ठीत सांगितले प्रेयसीच्‍या मावसभावाचे कारनामे...खून केल्‍यानंतर प्रेयसीचा मृतदेह आणला रेल्‍वे रुळाजवळ...