आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी आहे मुस्कान; कोतवाली पोलिस ठाण्याची मुलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - तेव्हा तिचे वय दोन वर्षांचे होते. नाव मुस्कान. वडील दारूडे. आई घर सोडून कायमची माहेरी गेलेली. म्हातारे आजोबा-आजी अतिशय गरीब. दूधदेखील मिळत नव्हते. अशी-तशी आठ वर्षे निघून गेली. नंतर तिला आश्रय मिळाला तो पोलिस ठाण्याचा. मुस्कान आता दहा वर्षांची झाली आहे. अगदी सर्वांची लाडकी मुलगी.

खरे तर ही गोष्ट मानवतेची आहे. निराशेचे हास्यामध्ये परिवर्तन होण्याची आणि पोलिसांच्या अनोख्या कामाची. मुस्कानचे वडील राकेश अजूनही दारूच्या नशेत धुंद असतात. जणू त्यांना चिमुकल्या मुलीशी काही देणे-घेणे नाही. कुटुंबाशीदेखील त्यांना काही जिव्हाळा नव्हता. म्हणूनच पत्नी मुलाला घेऊन कायमची माहेरी निघून गेली. त्यांना नव्याने संसार करण्याची इच्छाही राहिलेली नाही. शिवाय मुस्कानचे आजोबा पूरणमल व आजी प्रभाती यांनाही सून घरी आणण्याची इच्छा नाही. कारण राकेशमध्ये सुधारण्याची शक्यता त्यांना दिसत नाही. थकलेले आजोबा-आजी कसबसे जीवन जगतात.

कागदापासून तयार करण्यात येणार्‍या थैल्या व पूजेसाठी लागणारे साहित्य तयार करून या वृद्धांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यातूनच मुस्कानचेही कसेबसे पोट भरण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु 2011 मध्ये एके दिवशी जनतेच्या समस्यांविषयी चालवण्यात येणार्‍या मोहिमेअंतर्गत कॉन्स्टेबल त्रिलोक सिंग त्यांच्या घरी पोहोचले. गप्पागोष्टी करताना घरातील परिस्थिती व मुस्कानबद्दल माहिती मिळाली. नंतर त्यावर पोलिस ठाण्यात चर्चा झाली. ठाण्याचे प्रभारी सिंग राठोड यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर मुस्कानच्या आयुष्यात आशेची नवीन पहाट उजाडली. पोलिसांनी तिचे जेवण, संगोपन व शिक्षणाची जबाबदारी उचलली. त्याची जबाबदारी कॉन्स्टेबल त्रिलोक सिंग व प्रकाश चंद्र यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कर्मचारी बदलतात, नाते नाही
पोलिस ठाण्याची मुलगी झाल्यानंतर आतापर्यंत 40 पोलिस कर्मचार्‍यांची बदली झाली. एकूण स्टाफ 75 जणांचा आहे. कर्मचारीवर्ग बदलतो, परंतु मुस्कानला पोलिस आपल्या मुलीसारखेच मानतात. 2 जूनला तिचा वाढदिवस होता. मुस्कानने त्या दिवशी कॉन्स्टेबल प्रकाशचंद यांना फोन केला- प्रकाश अंकल, आज माझा बर्थ डे आहे. तुम्ही जरूर या. त्या दिवशी ठाण्यातील सर्व सदस्यांनी पैसे जमा केले. तिच्या घरी गेले. तिला सोबत घेऊन बाजारात गेले, कपडे, वस्तू खरेदी केल्या.