आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Cleric Gave Controversial Statement In Ayodhya

जमियतचे मुफ्ती म्हणाले, भगवान शंकर आमचे पहिले पैगंबर, हिंदुस्तानातील सगळेच \'हिंदु\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्या - जमियत उलेमाचे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भगवान शिव शंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते, असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांना हे मान्य करण्यात काहीही अडचण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढ्यावरच न थांबता मौलाना पुढे म्हणाले की, मुस्लिमही सनातनी आहेत आणि हिंदुंचे देव असलेले शंकर पार्वती आमचेही आई-बाप आहेत. आरएसएसच्या हिंदु राष्ट्रच्या मुद्यावर बोलताना मुस्लिम हिंदु राष्ट्रविरोधी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
'हिंदुस्तानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदु'
मुफ्ती मोहम्मद इलियास म्हणाले की, ज्या प्रकारे चीनमध्ये राहणारा चीनी, अमेरिकेत राहणारा अमेरिकन असतो त्याचप्रमाणे हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदु आहे. हे राष्ट्रावरून पडलेले नाव आहे. पुढे ते म्हणाले की, जर आमचे आई वडील, रक्त आणि देश एक आहेत तर आमचा धर्मही एकच आहे. यावेळी मुस्लिम शिष्टमंडळाने राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सतेंद्र दास आणि शनि धामचे महंत हरदयाल शास्त्री यांच्यासह दहशतवादाचा पुतळा जाळला.
जमियत उलेमांचे एक शिष्टमंडळ बुधवारी अयोध्येत आले होते. जमियतचे उलेमा 27 फेब्रुवारीला बलरामपूरमध्ये धार्मिक एकतेवर एक कार्यक्रम आयोजित करत आहेत. याच कार्य्रमात अयोध्येतील संतांना आमंत्रित करण्यासाठी हे शिष्टमंडळ अयोध्येत आले होते.