आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकमध्‍ये 57 मुस्लीम देशांचे काश्मिरवर एकमत, भारत म्हणाला - अंत पाहू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुस्लीम देशांची संघटना 'ऑर्गनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन' ने काश्मिरचा मुद्दा भारताचा अंतर्गत प्रश्न नसल्याचे म्हटले आहे. 57 मुस्लिम देशांच्या या संघटनेचे जनरल सेक्रेटरी इयाद मदनी यांनी शनिवारी नवाज शरीफ यांचे फॉरेन अफेअर्सचे सल्लागार सरताज अजिज यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीर प्रकरणी दखल द्यायला हवी असे म्हटले आहे. दुसरीकडे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

काय म्हणाल्या मुस्लीम संघटना..
- इस्लामाबादेत अजिज यांना भेटल्यानंतर मदनी म्हणाले, काश्मिरमध्ये स्थिती सुधारण्याऐवजी रोज खराब होत आहे. असे व्हायला नको.
- ते म्हणाले की, काश्मीरची दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती पाहता त्याठिकाणी जनमत घ्यायला हवे. भारताकडे इशारा करत मदनी म्हणाले, कोणी जनमताला का घाबरत आहे. भारताने आजवर जनमत घेण्यास विरोध केलेला आहे.
- मदनी म्हणाले की, रेफरेंडम हा एकच मार्ग शिल्लक आहे. तसे झाले तरच या परिसरात शांतता राहील.
- संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार या समस्येचा तोडगा शोधायला हवा असेही ते म्हणाले. काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या मुद्द्यावरही आवाज उठवला.

राजनाथ यांचा पाकला इशारा
- गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करू नये असे बजावले आहे. त्यांनी भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, नसता त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असे भारताने स्पष्टपणे सुनावले आहे.
- ते म्हणाले की, भारतीय मुस्लीम देशाच्या संरक्षणासाठी रक्ताचा अखेरचा थेंबही अर्पण करेल. हे शेजाऱ्यांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे.

बलुचिस्तानात भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी,पाकचे झेंडे जाळले
- पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर बलुचिस्तानात लोकांनी शनिवारी भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच पाकिस्तानचे झेंडे जाळले. त्याच्या तत्काळनंतर दोन्ही देशांच्या सीमा बंद करून त्याठिताणी लष्कर तैनात करण्यात आले.
- पाकिस्तानच्या सीमेत काही लोक पाकिस्तानी झेंडा घेऊन उभे होते. त्यांच्या हातून झेंडा हिसकावून त्याला आग लावली.
- एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीमेवरील स्पिन बोल्दाक नावाच्या छोट्याशा गावातील अफगाणिस्तानी लोकांनी भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, काय म्हणाल्या मुस्लीम संघटना...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...