आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Girl Marriage To Hindu Boy At Panipat. Latest News In Marathi

मुस्लिम मुलीने केले \'शिवशंकर\'सोबत लग्‍न, हिंदू महासभेकडून नवदाम्‍पत्‍याचा सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवदाम्पत्य - Divya Marathi
नवदाम्पत्य
पानीपत - हरियाणातील एका मुस्लिम युवतीने हिंदू युवकासोबत लग्‍न केले आहे. प्रेमविवाह करणार्‍या शिवशंकर आणि पत्‍नी सोनाली या जोडप्‍याला हिंदू महासभेने सन्‍मानित केले आहे.
लग्‍नापूर्वी सोनाली हिचे नाव सितारा होते.शिवशंकराच्या कुटुंबियांवर विश्वास ठेऊन त्याच्यासोबत विवाहाचा निर्णय घेतल्याचे सोनालीने सांगितले.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्‍ह्यातील शाहजहांपूर या गावातील शिवशंकर व सितारा उर्फ सोनाली यांच्‍या विषयीची ही माहिती हिंदू महासभेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत उघड झाली आहे.
सुरक्षा आणि रोजगाराची मागणी
हरियाणा सरकारच्‍या वतीने या नवविवाहीत जोडप्‍याला सुरक्षा आणि रोजगार देण्याची मागणीही पत्रकार परिषदेत करण्‍यात आली. जात पंचायतीमध्‍ये वर आणि वधू या दोन्ही पक्षांच्‍या सहमतीनंतरच हे लग्‍न करण्‍यात आले. मात्र, चार-पाच दिवसानंतर वधू पक्ष या नवदाम्‍पत्‍याच्‍या शोधात गढपूरला पोहोचले. त्यांनी नवदाम्पत्यावर हल्लाही केला होता. नवदाम्पत्याच्या जीवाला धोका आहे. युपीतील आजमा खान नामक व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या मागावर आहे, तर हरियाणातील अली बास हा व्‍यक्‍तीही त्‍यांचा शोध घेत आहे. त्‍यामुळे सरकारने त्‍यांना सुरक्षा आणि रोजगार द्यावा, अशी मागणी करण्‍यात आली आहे.
देशात लागू व्‍हावा एक समान कायदा - सिवाच
प्रेमविवाह करणार्‍या या नवदाम्‍पत्‍याला हिंदू महासभा सर्व प्रकारचे सहकार्य आणि मदत करणार आहे. या दोघांना सुरक्षा आणि रोजगार मिळावा अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे प्रदेशाध्‍यक्ष धर्मपाल सिवाच यांनी केली आहे. या दाम्‍पत्‍यांसोबत काही अनुचित प्रकार घडल्‍यास त्‍याला हरियाणा बरोबर उत्‍तर प्रदेश सरकारही जबाबदार राहणार आहे. हरियाणा सरकार तर केवळ बेटी बचाव अभियानच चालवत आहे. मात्र हिंदू महासभा बहू लाओ, बेटी बचाओ चा नारा देत आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...