आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर कोर्टात पती तलाक-तलाक-तलाक ओरडून झाला फरार, पत्नी बेशुद्ध होऊन पडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंडा (उत्तर प्रदेश) - तीन तलाकवर देशभरात चर्चा सुरु असताना एका व्यक्तीने भर कोर्टात त्याच्या पत्नीला एका श्वासात तीनवेळा तलाक म्हणून कोर्टातून पळ काढला. हुंड्याची मागणी आणि मारझोड करणाऱ्या पतीच्या तोंडून तीनवेळा तलाक ऐकल्यानंतर त्याची पत्नी बेशुद्ध होऊन खाली पडली. तिला एक लहान मुलगी देखिल आहे. विशेष म्हणजे, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने तीन तलाक देणाऱ्यांना समाजाने बहिष्कृत करावे असे म्हटल्याच्या तिसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे.
 
पतीवर होता हुंड्याची मागणी, मारहाणीचा आरोप
- पीडित महिलेचे वडील मसीउल्लाह अन्सारी यांनी सांगितले, की त्यांची मुलगी रुकय्याला तिचा पती महफूज रोज मारहाण करत होता. त्यासोबतच हुंड्याची मागणी करत होता. 
- त्यांनी सांगितले, की या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आणि फॅमिली कोर्टात केस चालू आहे. सोमवारी कोर्टाची तारीख होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...