आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूंच्या बरोबर मुस्लिम पोहोचू शकणार नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - ऑल इंडिया मजलिस-ए-एतिहादुल मुसलमीन (एमआयएम) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांच्या पक्षाच्या वतीने येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. या वेळी बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देशात मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याच्या भाजप व संघ परिवाराच्या आरोपाचे खंडन केले. पुढच्या २५० वर्षांतही मुस्लिमांची लोकसंख्या हिंदुंच्या बरोबर पोहोचू शकणार नाही. २००१ व २०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी झाले आहे. आपला पक्ष उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागांवर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा ओवेसी यांनी केली. पण पक्ष किती जागा लढवणार व कुणासोबत युती करणार का? याचा खुलासा ओवेसी यांनी केला नाही. आग्रा,अलाहाबाद व आजमगड येथे सभा घेण्याचा ओवेसी यांचा प्रयत्न होता. परंतु स्थानिक प्रशासनाने त्याला परवानगी नाकारली. त्यानंतर त्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून उद्देश साध्य केला.