आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी तलाकबाबतच्या निकालावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नाराज, समिती स्थापण्याचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- तिहेरी तलाकबाबत २२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रविवारी येथे झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त करून शरियतमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे नमूद केले. तिहेरी तलाक वाईटच, परंतु न्यायालयाचा निकाल ही धार्मिक भावनेला ठेच आहे, असे बोर्डाने म्हटले आहे. याबाबत १० सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला.

या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणार का, या प्रश्नावर बोर्ड कार्यसमिती सदस्या असमा जोहरा यांनी थेट उत्तर न देता अगाेदर समिती स्थापन होऊ द्या, असे उत्तर दिले. दरम्यान, बोर्डाच्या या बैठकीत तिहेरी तलाकवरच बराच वेळ चर्चा चालल्याने बाबरी मशिद प्रकरणी सखोल चर्चा होऊ शकली नाही. तिहेरी तलाकचे आम्ही पाठीराखे नाहीत. इस्लामलाही हे आवडत नाही. ही प्रवृत्ती वाढू नये म्हणून देशभर बोर्डाच्या महिला शाखा कार्य करतील, असे असमा जोहरा म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...