आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Rashtriya Manch Says Madrasas Must Hoist Tricolour Republic Day

मदरशांत तिरंगा फडकवा - RSS; नागपूरमध्‍ये राष्‍ट्रध्‍वजाला वंदन का नाही - देवबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारनपूर (यूपी) - यंदाच्‍या प्रजासत्‍ताक दिनी मदराशांमध्‍ये राष्‍ट्रध्‍वज फडकावा, असे आवाहन आरएसएसशी निगडित असलेल्‍या मुस्लिम राष्‍ट्रीय मंचने देशभरातील मदराशांना केले. या संबंधी दारुल उलूम देवबंद आणि नदवाला यांना पत्रही लिहिले आहे. मात्र, आरएसएस आपल्‍या नागपूरच्‍या मुख्‍यालयावर तिरंगा फडकवेल का ?, असा देवबंदने उपस्‍थ‍ित केला.
मुस्लिम राष्‍ट्रीय मंचने पत्रात काय म्‍हटले ?
- मुस्लिम राष्‍ट्रीय मंचचे यूपी समन्‍वयक मोरध्‍वज सिंह यांनी या बाबत माहिती दिली.
- ते म्‍हणाले संपूर्ण भारतात आम्‍ही ही मोहीम राबवत आहोत.
- देवबंद आणि नदवाला पत्र लिहून यामध्‍ये सहभागी होण्‍याचे आवाहन केले.
देवबंदने काय प्रश्‍न विचारले ?
- देवबंदचे माध्‍यम सचिव मौलाना अशरफ उस्‍मानी म्‍हणाले, "आरएसएस आपल्‍या नागपूरच्‍या मुख्‍यालयावर तिरंगा फडकवणार आहे का ? आरएसएस राष्‍ट्रगीतावर विश्‍वास ठेवतो का ?''
- देवबंदच्‍या 'जमीयत उलेमा ए हिंद' या संस्‍थेशी निगडित असलेल्‍या बहुतांश मदराशांमध्‍ये 15 ऑगस्‍ट आणि 26 जानेवारी उत्‍साहात साजरे केले जातात. राष्‍ट्रध्‍वजाला वंदनही केले जाते. शिवाय या दिवशी सुटीही दिली जाते.
- स्‍वांतत्र्य चळवळीत मदरशांची महत्‍त्‍वाची भूमिका आहे.
- देश स्‍वातंत्र्यांसाठी आरएसएसने काय केले ? आरएसएस केवळ एकाच झेंड्याला मानतो आणि वंदन करतो.
- आरएसएसच्‍या प्रत्‍येक कार्यक्रमामध्‍ये केवळ याच एका रंगाच्‍या झेंड्याला वंदन केले जाते.
- मदराशांना आदेश किंवा सल्‍ला देण्‍याचा आरएसएसला हक्‍क नाही.
- प्रजासत्‍ताक दिनी झेंडावंदन करायचे की नाही, हा मदराशांचा प्रश्‍न आहे.

मुस्लिम राष्ट्रीय मंचने काय उत्‍तर दिले ?
- मोरध्‍वज सिंह यांनी म्‍हटले, आरएसएसच्‍या मुख्‍यालयात विद्यार्थी आणि स्‍वयंसेवक राहतात. - 15 ऑगस्‍ट आणि 26 जानेवारीला त्‍या ठिकाणी झेंडावंदन होतेच शिवाय उत्‍सवसुद्धा साजरा केला जातो.