आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim 'Shravan Kumar' Undertook Kanwar Yatra Carrying Parents On Shoulders

मुस्लीम श्रावण बाळ - 14 व्या वर्षापासून जोपासले आई वडिलांच्या कावड यात्रेचे व्रत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः प्रतिकात्मक
डेहरादून - दिल्लीच्या एका मुस्लीम युवकाने आधुनिक युगातील श्रावण बाळ असल्याचे दाखवून दिले आहे. श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावडामध्ये बसवून त्यांना यात्रेला नेले होते. त्याचप्रमाणे साजीद अली खान हा युवक दरवर्षी आपल्या आई वडिलांना कावडामध्ये बसवून यात्रेसाठी घेऊन जातो.
साजीद अली खान नावाचा हा युवक आपल्या खांद्यावर दोन कावडांमध्ये आपल्या आई वडिलांना बसवून कावड यात्रेत सहभागी होत आहे. साजीदचे आई वडिल चालू-फिरू शकत नाहीत. त्यामुळे तो त्यांना कावडात बसून यात्रेला घेऊन जातो. वयाच्या चौदाव्या वर्षापासून साजीदने या माध्यमातून आपल्या आई वडिलांच्या सेवेचे व्रत जोपासले आहे. त्यावेळी तो आपल्या आई वडिलांना दिल्लीहून हरिद्वारला घेऊन जायचा. कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी त्याने एक खास पालखीही तयार करून घेतली आहे. साजीद नुकताच हरिद्वारहून गंगाजल घेऊन आपल्या आई वडिलांसह रूरकी येथे पोहोचला, त्यावेळी तो लोकांच्या चर्चेचा विषय बनला होता.