आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदचे शीर कापणाऱ्याला 1 Cr, मुस्लिमांनी जाहीर केले \'इनाम\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- लष्कर-ए-तोएबाचा म्होरक्या हाफिज सईदचे शीर कलम करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षिस भिलाई येथील मुस्लिम समाजाने जाहीर केले. हाफिज सईद दहशतवाद्यांचा मास्टर माईंड आहे तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ केवळ 'कठपुतली' आहेत. नवाज शरीफ यांच्या शीरावरही आम्ही बक्षिस जाहीर केले असते पण त्यांची तेवढीही 'औकात' नाही, असे येथील मुस्लिमांनी सांगितले आहे.
लष्करात जाण्याची तयारी, जमिनी विकून पैसा देणार
- शुक्रवारी सायंकाळी जुमेकी नमाज झाल्यानंतर विशेष दुआ करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांचा खातमा करण्याची दुवा मागण्यात आली. तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्धस्त करण्यासाठी भारतीय लष्कराला यश मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली.
- यावेळी नवाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांच्या पुतळे महिलांच्या वेशात सजवण्यात आले. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद असे नारे देण्यात आले.
- मदरस्याचे मुफ्ती कलीम अशरफ यांनी जाहीर केले, की भारतातील प्रत्येक मुस्लिम देशासाठी प्राण देण्यास तयार आहे. आम्ही भारतीय लष्करात जाण्यासाठी तयार आहोत. युद्ध झाले तर आम्ही भारतासोबत राहू.
- आम्ही आमच्या जमिनी विकून एक कोटी उभे करु. हाफिज सईदचे शीर कापून आणणाऱ्याला देऊ, असे मदरसा दारुल उलूम इस्लामियाचे अध्यक्ष गफ्फार खान यांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, यावेळी काढण्यात आलेल्या जुलूसचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...