पूंछ - जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या निवडणुकी आधी भाजपने मुस्लिमांना
आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानातील मुस्लिमांपेक्षा भारतातील मुस्लिम समाज हा जास्त सुखी आणि संपन्न आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला आहे. सूरणकोट येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना हुसेन यांनी हा दावा केला. ते म्हणाले की भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो तुमच्या समस्या संपवू शकतो. राज्याचा विकास व्हावा अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे. रोजगार, सुरक्षा, दहशतवाद, शिक्षण, भ्रष्टाचार, पिण्याचे स्वच्छ पाणी आदी विषयांवर भाजपच मार्ग काढू शकते, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार आणा, असे आवाहन हुसेन यांनी केले.