आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप आमदाराची पोलिसांच्‍या घोड्याला मारहाण, पाय मोडल्‍याच्‍या आरोपात गुन्‍हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहरादून- मसूरीचे भाजपाचे आमदार गणेश जोशी यांनी पोलिसांच्‍या घोड्याला अमानुष मारहाण केल्‍यामुळे घोड्याचा पाय मोडला, असा दावा सत्ताधारी काँग्रेसने केला. मात्र घोड्याचा पाय तुटल्‍याचे वेगळेच कारण व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी जोशी यांच्‍यावर गुन्‍हाही दाखल झाल्‍याची माहिती आहे. काय आहे प्रकरण..

- भाजपने भ्रष्टाचार व कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात विधानसभेवर मोर्चा काढला होता.
- सोमवारी निघालेल्‍या या मोर्च्याला उत्तराखंड पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
- गर्दी नियंत्रित करण्‍यासाठी काही पोलिस घोड्यावर आले होते.
- घोड्याने भाजप नेत्‍याला लाथ मारली होती, अशी माहिती आहे.
- डेहराडूनचे पोलिस अधिक्षक सदानंद दाते म्‍हणाले - व्हिडिओमध्ये आमदार गणेश जोशी लाठीच्या सहाय्याने घोड्याला मारताना दिसत आहेत.
- या घटनेनंतर आमदार जोशी आणि इतरांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

घोड्याने मारली लाथ..
- दरम्‍यान एका घोड्याने भाजपच्‍या नेत्‍यांना लाथ मारल्‍याची माहिती होती.
- आमदारांनी लाठीने घोड्याला मारहाण कऱण्यास सुरुवात केली, अशी माहिती आहे.
- एवढ्यात घोड्याचा पाय मोडला व तो जमिनीवर कोसळला.
दोन व्‍हिडिओ आले समोर..
- या संदर्भात नुकतेच दोन व्हिडिओ समोर आले आहेत.
- पहिल्या व्हिडिओत आमदार काठीने हल्ला करत आहे आणि घोड्याचा पाय मोडला आहे.
- दुस-या व्हिडिओत धक्काबुक्कीनंतर घोडा जीपला धडकला व त्याचा पाय एका मॅनहोलमध्ये अडकला, असे दिसते. अपघातामुळेच या घोड्याचा पाय तुटला असा दावा भाजपने केला आहे.
- सदानंद दाते म्‍हणाले - घोड्याला मिलिटरी अकॅडमीच्‍या रूग्‍नालयात दाखल करण्‍यात आले.
- घोड्याच्‍या पायावर शस्‍त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, घोड्याला मारताना आमदार दिसत आहेत..
काय म्‍हणाले आमदार..
बातम्या आणखी आहेत...