आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muzaffarnagar Communal After Throw Pieces Meat Tension

उत्तर प्रदेशात तणाव; शिवलिंग तोडले, मंदिरात फेकले प्राण्यांचे कापलेले शीर आणि मांस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर/मेरठ- उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये शनिवारी जातीय तणाव निर्माण झाला. सहारनपूरमधील बडूलीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी शिव मंदिरातील शिवलिंग तोडले तर मुजफ्फरनगर जिल्ह्यातील परासोली येथील प्राचिन शिव मंदिरात शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी दोन प्राण्यांचे कापलेले शीर आणि मांसाचे तुकडे फेकल्याने तणाव निर्माण झाला आहे.

शिव मंदिरात दोन प्राण्यांचे कापलेले शीर फेकल्याचे समजतात शेकडो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिस आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. घटनास्थळी पोहोचलेले केंद्रीय कृषी राज्य मंत्री डॉ. संजीव बालियान यांनाही संतप्त जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. डॉ. संजीव बालियान यांच्या समोरच महिलांनी 'मंत्री वापस जा' अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी परासोली गावातील दुर्गा मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी प्राण्याचे कातडे लटकवले होते. तसेच धार्मिक पुस्तकांतील पानांसह एक धमकीचे पत्रही ठेवले होते. 'धर्मांतर न केल्यास त्याचा वाईट परिणाम भोगावा लागेल', असा पत्रात संदेश लिहिला होता. याप्रकरणी परारोलीमध्ये तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून लोकांना शांत केले होते.

याप्रकरणी उपजिल्हाधिकारीच्या नेतृत्त्वाखाली शांतता समिती स्थापन करण्‍यात आली होती. मात्र, शुक्रवारी पुन्हा शिव मंदिरात प्राण्यांचे शीर आणि मांसाचे तुकडे आढळून आल्याने शांतता समितीच्या सदस्याने तातडीची बैठक बोलावून गावात शांतता आणि सद्‍भावना कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
आरोपीला जेरबंद करण्याची मागणी...
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिव मंदिर स्वच्छ करण्‍याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त लोकांना पोलिसांना रोखून आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ जेरबंद करण्‍याची मागणी केली. पोलिस रात्री पररोली परिसरात गस्त घालतात. तरीदेखील अशा घटना घडतातच कशा? असा सवाल संतप्त लोकांनी पोलिसांना केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा घटनेची छायाचित्रे....