आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर लोकसभा मतदारसंघामध्ये नवरा-बायकोची घरातील भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. बहुजन समाज पक्षाचे खासदार कादीर राणा यांच्या पत्नी शाहिदा बेगम यांनी पतीविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे राणा मुजफ्फरनगरचे विद्यमान खासदार आहेत. बसपाने या निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. राणा 2007 मध्ये समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय लोकदलमध्ये सहभागी झाले होते. यानंतर 2009 मध्ये त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला होता. मुजफ्फरनगर दंगल प्रकरणात ज्या दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्यात राणा यांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.