आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सेन्सॉरशिप\'नंतरही लपून राहिले नाही मुझफ्फरनगरचे चित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर - दंगलग्रस्त मुजफ्फरनगरमधील हिंसेची आग आता शेजारील मेरठ आणि बागपत जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे. उत्तरप्रदेश सरकार दंगल अटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका विरोधक ठेवत आहेत. लष्कराला पाचारण केल्यानंतरही परिस्थिती फारशी बदलेली नाही.

मुजफ्फरनगरमध्ये माध्यमांवर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने रविवारी शहरात वृत्तपत्र वितरण बंद केले होते. त्यानंतर डीएमने जिल्ह्यातील दंगलग्रस्त भागात इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना जाण्यासही बंदी घातली. आजही (सोमवार) जिल्ह्यात वृत्तपत्रांचे वितरण रोखण्यात आले. जिल्ह्याच्या सीमेवरच वृत्तपत्रे घेऊण येणा-या वाहनांना अडवण्यात आले आणि वृत्तपत्रांचे गठ्ठे जप्त करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या या अघोषित बंदीनंतरही दंगलग्रस्त भागातील भयावह चित्र जगापर्यंत पोहोचत आहे. मुजफ्फरनगरमधील लोक इंटरनेट आणि इतर माध्यमांचा वापर करून बातम्या जाणून घेत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, देशातील प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली मुजफ्फरनगर दंगलीनंतरची छायाचित्रे आणि जाणून घ्या तेथील परिस्थिती..