आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muzaffarnagar Riots Serious And May Spread Warns IB

मुजफ्फरनगर दंगलीचे लोण देशात पसरण्‍याचा धोकाः गुप्‍तचर खात्‍याचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगरमध्‍ये भडकलेल्‍या दंगलींचे लोण इतर भागातही पसरण्‍याची भीती असल्‍याचा इशारा गुप्‍तचर खात्‍याने केंद्र सरकारला दिला आहे. आयबीने मुजफ्फरनगर येथील परिस्थितीचा आढावा घेतल्‍यानंतर एक अहवाल तयार करुन सरकारला पाठवला आहे. दंगलीचे लोण आता पश्चिम उत्तर प्रदेशात पसरत आहे. या दंगली वेळीच नियंत्रणात आल्‍या नाही तर परिस्थिती बिकट होण्‍याची शक्‍यता आहे. बरेली, अलिगढ, मथुरा, हापूड मिरत, मुरादाबाद, रामपूर, सहारनपूर इत्‍यादी भागात दंगल पसरण्‍याची शक्‍यता आयबीने व्‍यक्त केली आहे.

मुजफ्फरनगर आणि शामलीत जातीय हिंसाचारात आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे दंगलीतील मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. घटनेच्या चौकशीसाठी सरकारने न्यायालयीन आयोगाची नेमणूक केली आहे. दंगेखोरांनी सोमवारी तीन दुचाकीस्वारांवर गोळ्या झाडल्या. यात एकाचा मृत्यू झाला. दुस-या एका व्यक्तीची शामलीमध्ये हत्या झाली. दंगलग्रस्त भागात 48 तास संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे मुजफ्फरनगरचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले. मुजफ्फरनगरमध्ये गुरुवारपर्यंत शाळा, कॉलेजेस बंद राहतील. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असून, सर्व रेल्वेस्थानके आणि उत्तराखंडमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.