आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजफ्फरनगरमध्ये अजूनही सुरक्षा तोकडी, पुन्हा महापंचायतची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. आधी झालेल्या दंगलीत 62 जण मारले गेले होते. बुधवारी सायंकाळी एका महिलेसह चौघांची हत्या करण्यात आली. त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना भागात नव्याने दंगल उसळली. मुजफ्फरनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था तोकडी पडल्याची कबुली पोलिस महासंचालक देवराज नागर यांनी दिली आहे. बुधवारच्या घटनेत मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह मदरशात ठेवण्यात आले आणि पंचायत बोलावण्यात आली. मुस्लिम समुदायाच्या लोकांनी प्रशासनाकडे पाच मागण्या केल्या आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ऐतिहासिक पंचायत बोलावण्याची घोषणा केली आहे. त्यावेळी समाजवादी पक्षाचे अनेक नेतेही उपस्थित होते.
बुढानामध्ये दंगल उसळण्याआधी काही जणांनी बाजारातून पतीसोबत परतणार्‍या महिलेवर बलात्कार करून गोळ्या झाडल्या. पतीने आपल्या समाजातील लोकांना याची माहिती दिली. यानंतर संबंधित समुदायाच्या लोकांनी आरोपींची बाजू घेणार्‍या तिघांची हत्या केली. मुहम्मदपूर रायसिंहपूर व हुसैनपूर गावातील लोकांमध्ये ही चकमक उडाली. या प्रकरणी पोलिस महासंचालक नागर यांनी गुरुवारी सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याची कबुली दिली. बुधवारची घटना रोखता आली असती. पोलिस संरक्षणात कमतरता होती. यामुळे लोकांची हत्या करण्याइतपत मजल गेली. यात सहभागी लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आठ अटकेत, पंधराविरुद्ध खटले
दंगल प्रकरणात आठ व्यक्तींना अटक करण्यात आली असून 15 जणांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. ताज्या हिंसाचारात आठ व्यक्तींना अटक केली असून 15 नागरिकांविरुद्ध खटले दाखल केल्याचे बुढानाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एच. एम. सिंह यांनी सांगितले.