आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muzaffarnagar Riots We Are Responsible For Riots

मुझफ्फरनगर : वाचा त्या मुलीची आपबिती, जिच्या छेडछाडीनंतर उसळली दंगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरनगर - मुलींच्या संरक्षणाची चिंता आणि रुढी-परंपरांमुळे मुझफ्फरनगरच्या ग्रामीण भागात मुलींना चारभिंतीबाहेर पडू दिले जात नव्हते. जग बदलले तसे इथेही मुली बाहेर पडू लागल्या, शाळेत जाऊ लागल्या. 27 ऑगस्ट रोजी अशाच एका शाळकरी मुलीची छेड काढली गेली आणि कवाल गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या या मुलीच्या दोन भावांसह तीन जणांची हत्या करण्यात आली. त्यानंतर उसळलेली दंगल संपूर्ण देशाने पाहिली आहे. नववीत शिकत असलेली ती विद्यार्थीनी आता शाळेचे नाव घेण्यास घाबरत आहे. 'आमच्यामुळे दंगल उसळली असेल तर शाळाही नको आणि शिक्षणही नको.' आम्ही शाळेत न गेलेलेच बरे अशी भावना तिने व्यक्त केली आहे. मुझफ्फरनगरच्या त्या मुलीसोबत सर्वात प्रथम 'दिव्य मराठी' नेटवर्कने बातचीत केली आहे.

मुझफ्फरनगर जिल्ह्यापासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर 28 उंब-याचे मलिकपूरा गाव आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय. या गावातील मुलींची पहिली पिढी सध्या शाळेत जात आहे. यातीलच एका मुलीसोबत ही घटना घडली आहे.