आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Buffalo Most Famous Compare To Victoria Prince, Samajwadi Party Leader Khan Said

माझ्या म्हशी व्हिक्टोरिया राणीपेक्षाही प्रसिद्ध, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान वैतागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - चोरीस गेलेल्या म्हशी आणि त्यानंतर तीन पोलिसांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठवल्यामुळे सपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री मोहंमद आझम खान वैतागले आहेत. माझ्या म्हशी ब्रिटनच्या व्हिक्टोरिया राणीपेक्षाही प्रसिद्ध झाल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
एका कार्यक्रमात मंगळवारी ते बोलत होते. एक फेब्रुवारी रोजी रामपूर येथील फार्महाऊसवरून खान यांच्या सात म्हशी चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर रामपूरची अवघी पोलिस यंत्रणा मंत्रिमहोदयांच्या म्हशी शोधण्यासाठी कामाला लागली होती. पोलिस पथकातील श्वान, क्राइम ब्रँचचे गुप्तचर, विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी शहरभर म्हशींचा शोध घेत होते. पोलिसांनी अनेक खाटीकखाने, मटणाच्या दुकानांवर छापे मारले होते. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी दोन दिवसांत आझम खान यांच्या म्हशी शोधून काढल्या. तरीही नाराज मंत्रिमहोदयांमुळे एक फौजदार आणि दोन हवालदारांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले होते.
काश मेरा नसीब भी भैसों जैसा होता...
आप जरा मेरे भैसोंका नसीब तो देखिए , अल्लाह...मै तो अपने नसीब से रश्क करता हूँ की काश मेरा नसीब भी भैंसो जैसा होता.कितनी इज्जत अफजाई है । मेरी भैसोंको जो शोहरत हासिल है जो गालिबन मलिका विक्टोरिया को भी कभी नही मिली होगी. मेरी दुआ है अल्लाह से की मेरी भैसों का गोबर उन सब के सिरों पर आ जाए जो उन्हे अब तक नही उठा सके है ।