आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळातील ही बहुदा शेवटची कोलकाता भेट : मुखर्जी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- मूळचे पश्चिम बंगालचे असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर आहेत. पुढील महिन्यात त्यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपणार आहे. या पार्श्वभूमीवर कोलकात्यात आयोजित एका समारंभात ते भावुक झाले. राष्ट्रपतिपदाच्या काळातील कदाचित ही आपली शेवटची कोलकाता भेट असेल, असा त्यांनी या वेळी आवर्जुन उल्लेख केला. 

प्रणव मुखर्जी हे मूळचे पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील मिराती या गावचे आहेत. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून विधीची पदवी मिळवली आहे. पी. सी. महालनोबिस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी प्रणव मुखर्जी यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी त्यांनी विद्यार्थी, संशोधक तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “मानवी मेंदूतच विकासाचे आणि प्रगतीचे मूळ दडलेले असते. 
 कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी याचा योग्यप्रकारे उपयोग केल्यास नक्कीच कोणत्याही समस्यांवर तोडगा निघू शकतो.’  या वेळी त्यांनी १९९० च्या दशकात तत्कालीन सरकारने उदारीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचा आवर्जुन उल्लेख केला. 

जातीपातीच्या आधारे विकास नको: राष्ट्रपती
भारताने केवळ जाती-धर्माच्या आधारावरच प्रगतीची कास धरायला नको तर समग्र दृष्टिकोनातून विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करायला हवे, असे मत राष्ट्रपतींनी या वेळी व्यक्त केले.  देशात अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मागील काळात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. भारत हा ७ धर्म, २०० भाषा, १८०० बोलीभाषेने मिळून बनलेला देश आहे. आपण जाती, धर्म, समूहाच्या जोखडात अडकू नये. समग्र दृष्टिकोनातून विकास साधावा.
बातम्या आणखी आहेत...