आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेतील बॅनर : तुम्हाला आमचे आयुष्य लाभो, मोदी म्हणाले- तुमच्यासाठी माझे जीवन समर्पित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुमका - झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण ताकत लावली. सोमवारी त्यांनी दुमका आणि पतनामध्ये दोन सभा घेतल्या. या सभेतील एक बॅनर पाहून मोदी गहिवरले.
तुम्हाला आमचे आयुष्य लाभो, असे वाक्य या बॅनरवर लिहिले होते. त्यावर मोदी यांनी ‘तुमच्या भल्यासाठी माझे आयुष्य खर्ची पडो, त्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या’ असे मार्मिक उत्तर भरसभेतून दिले. दरम्यान, त्यांनी तीन ते चार पक्षांच्या यूतीवर जोरदार टीका केली. असे पक्ष एकत्रित येऊन सरकार बनवतात आणि नंतर जनतेला लुटण्याचे काम करतात. अशा लुटारूंना शिक्षा द्या, असे त्यांनी या टीकेतून म्हटले.झारखंडमध्ये २० डिसेंबर रोजी अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे.