आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Muslim Identity Was Thrust On Me In 1992: Shabana Azmi

देशात असहिष्‍णुता होती आणि ती कायम राहणार, शबाना आजमी यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - देशात असहिष्‍णुतेच्‍या वाढत असल्‍याच्‍या चर्चेने वातावरण तापले आहे. असहिष्‍णुतेचा निषेध म्‍हणून विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, सिनेकलाकार यांनी पुरस्‍कार वापसी केली. या वादात आता प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री शबाना आजमी यांनीही उडी घेतली. शनिवारी एका कार्यक्रमात त्‍या म्‍हणाल्‍या, ''मी मुस्‍लीम आहे, याची जाणीव पहिल्‍यांदा 1992 मध्‍ये झाली. त्‍यावेळी प्रत्‍येक जण म्‍हणत होता - “ओह- तुम्‍ही तर मुसलमान आहात,” असे सांगत देशात असहिष्‍णुता वाढत होती. आता ती वाढत असून, यापुढेही कायम राहील, असे त्‍या म्‍हणाल्‍या.
शबाना पुढे म्‍हणाल्‍या, ''आजघडीला धर्मच आपल्‍या देशाची ओळख बनण्‍याचा प्रयत्‍न होत आहे,'' अशी खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
काय झाले होते 1992 मध्‍ये ?
- 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्यामध्‍ये हिंदू कारसेवकांडून बाबरी मशीद पाडली. यानंतर देशात दंगे भडकले.
- मुंबईमध्‍ये डिसेंबर 1992 ते जानेवारी 1993 मध्‍ये धार्मिक तणाव निर्माण झाला. यात 900 लोक ठार झाले.
अजून काय म्‍हणाल्‍या शबाना...
> जोपर्यंत मनुष्‍य आहे तोपर्यंत असहिष्‍णुता राहील. मात्र, जेव्‍हा यामुळे कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होते तेव्‍हा सरकारने कारवाई करणे गरजेचे आहे.
> या देशात अनेक संस्‍कृती, धर्माचे लोक राहतात. असहिष्‍णुता पूर्वीसुद्धा होती आणि या पुढेही राहील. त्‍या विरुद्ध सर्वच स्‍तरातील लोकांना एकत्र यावे लागेल. त्‍यासाठी चर्चा नव्‍हे तर कृती करणे आवश्‍यक आहे.
< 1992 पर्यंत मी समजत होती की, मुस्‍लीम असणे ही केवळ माझी एक ओळख आहे. मात्र, त्‍या काळात प्रत्‍येकच जण विचार होता की, “ओह- तुम्‍ही मुस्लिम आहात.”
> पण, ही भारताची ओळख नाही. आपला देश गंगा- जमुनाची संस्‍कृतीसाठी ओळखला जातो. आपली एकताच आपली सर्वात मोठी ताकद आहे. ती कायम ठेवली तरच देश कायम राहील.
< कश्मीरी हिंदू आणि कश्मीरचे मुस्‍लीम पाहा धर्म वेगवेगळे आहेत. परंतु, संस्‍कृती एक आहे. कश्मीरचा मुस्‍लीम स्‍वत:ला तमिळनाडूच्‍या मुस्‍लीमांपेक्ष सांस्‍कृतिकदृष्‍ट्या स्‍वत:ला वेगळे समजतो. पण, त्‍याला कश्मीरी हिंदू जवळचा वाटतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहे #Intolerance चा वाद, आतापर्यंत कुणी परत केले पुरस्‍कार ?