आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचे हृदय कामी आले असते तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलवर/जयपूर - कोण म्हणतो माझा मुलगा राहिला नाही? ज्यांना त्याची किडनी, यकृत दिले. त्यांच्यात तो जिवंत आहे. त्याचे हृदय कोणाच्या उपयोगी पडले नाही याचेच वाईट वाटते. हे मनोगत आहे ब्रेन डेड डोनर मोहितच्या आईचे. सहा वर्षांच्या मोहितच्या किडनी आणि यकृतामुळे अलीकडेच दोन जणांना जीवनदान मिळाले आहे. डॉक्टरांनी त्याचे हृदयही काढले होते, पण त्याचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही.

हृदय काढले होते, पण उपयोग झाला नाही
अलवरपासून ६० किमी अंतरावरील तिलवाड गावात राहणा-या कल्याण सहाय शर्मा यांचा मुलगा मोहित (वय ६) ३० जानेवारी रोजी चारा कापण्याच्या यंत्रात अडकला होता. डॉक्टरांनी ६ फेब्रुवारीला मोहितला ब्रेन डेड घोषित केले. मोहितचे आई-वडील म्हणाले, ‘रुग्णालयात इतर गंभीर रुग्णांना पाहून मन विचलित झाले. मोहितच्या मृत शरीरामुळे कोणाचे भले होत असेल तर त्यापेक्षा चांगले काय असू शकते, असा विचार केला. काही नातेवाइकांनी विरोध केला. पण मोहित कोणाच्या तरी रूपाने जिवंत तर राहील या जाणिवेने सर्वांनी होकार दिला.’
महात्मा गांधी रुग्णालयाच्या संचालकांनी मोहितच्या उपचारावर खर्च झालेले ७० हजार रुपये परत देण्याची ऑफर दिली होती, पण नातेवाइकांनी ती नाकारली.
नातेवाइकांच्या सहमतीनंतर मोहितच्या शरीरातून किडनी, यकृत आणि हृदय इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी काढण्यात आले. किडन्या ५० वर्षीय व्यक्तीला देण्यात आल्या, तर यकृत दिल्लीतील एका मुलामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. हृदय मात्र कामात आले नाही.