आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापणी लवताच 4 ते 8 आसनी होईल कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूर- येथे सुरू असलेल्या सायन्स काँग्रेसदरम्यान विद्यार्थ्यांनी बस अपघात आणि सुनामी सारख्या संकटातून जीव वाचवणाऱ्या कल्पना सादर केल्या. त्यात पार्किंग आणि वाहतुकीची डोकेदुखी ठरणारी समस्या सोडवणारे मॉडेल मांडले. लहान मुलांच्या विज्ञानविषयक काँग्रेसमध्ये अशा समस्यांवरील उपायदेखील सांगण्यात आले. या कल्पना प्रभावी तर आहेत. त्यासोबतच व्यावहारिकदृष्ट्या तितक्याच महत्त्वाच्यादेखील आहेत. चला, जाणून घेऊयात त्यापैकी तीन संशोधनाबद्दल...

एक्स्पेंडिबल फ्यूल कार : लिव्हर दाबताच वाढू लागेल : नाबित महाजन, आयुष सिंघल, सराह सुसन वार्के आणि सुमान्यु दत्ता यांनी सुतार कारागिराच्या मदतीने लाकडाचा ढाचा तयार केला. न्यूमॅटिक पिस्टन, स्लायडर, सोलेनोएड वॉल्व्ह सारख्या उपकरणांतून चार आसनी कारला आठ आसनी कारमध्ये रूपांतरिक करता येते.

सेफ्टी बस : उलटताच बटण दाबले जाईल आणि सगळ्या बाजूने उघडेल
बस उलटण्याच्या अनेक घटना घडतात. बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो. अनेक लोकांचे प्राण या कारणामुळेच जातात. केरळच्या टी. अपूर्वा हिने हायड्रोलिक काँम्प्रेसर व पिस्टन पंप आणि हायड्रोलिक टँक यांना जोडले. काॅम्प्रेसरच्या मोटरला बसच्या दोन्ही पृष्ठभागावर स्विचने जोडले. त्यामुळे बस उलटल्याबरोबर त्या बटणावर वजन पडेल. त्यानंतर बस सर्व बाजूने उघडली जाईल. आगीच्या घटनेत फायर सेन्सरची मदत होते.

मल्टिपर्पज व्हेइकल : पुरात अडकलेले लोक आणि सामानाला सुरक्षित आणेल
भिलवाडाच्या सरकारी शाळेत विद्यार्थी प्रवीण सिंहे जेबीसी यंत्राच्या साह्याने एक अजब वाहन तयार केले आहे. यंत्राच्या खालील भागात हायड्रोलिक जॅक लावून त्याची लांबी वाढवता येऊ शकते आणि वरचा भाग चारही बाजूने फिरणारा असा तयार केला जाऊ शकतो. पाण्यात वाहून जाणाऱ्या वस्तू किंवा सामानाला रोखता येते. मुले, महिला,आजारी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ते फायदेशीर आहे.