आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूआधी पत्नीशी फोनवर हे म्हणाला, मग किल्ल्यावर असा आढळला लटकलेला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - गुरुवारी मुलांना शाळेत सोडायला गेलेला 40 वर्षीय चेतन सैनीचा मृतदेह नाहरगड किल्ल्याच्या बुरुजावर शुक्रवारी दोरीने लटकलेला आढळला. दुसरीकडे, चेतनने पत्नी नीतूला फोन करून म्हटले होते की, तो रात्री 9 वाजेपर्यंत घरी पोहोचेल, जेवण तयार ठेव. सकाळी 10 वाजता चेतनचा भाऊ प्रीतमच्या मोबाइलवर व्हायरल झालेले सर्व फोटो व्हिडिओ आले. मृताची पत्नी नीतूने पाहिले तेव्हा तिने ओळखले आणि कुटुंबात एकच आक्रोश सुरू झाला.

घटना पाहून कोणीही आत्महत्या म्हणायला तयार नाही...


चेतनच्या उजव्या पायाच्या बुटात 10 वाजता चहाचे चार कप... 12 वाजता दगड कसे?

1. आत्महत्या करायची होती तर दगडावर पद्मावती चित्रपटाबद्दल व चेतन तांत्रिकबद्दल कोणी का लिहील?
2. पोलिसांनी चेतनच्या मोबाइलचा तपास केला तेव्हा कळले की, संध्याकाळी सव्वा पाच वाजता त्याने याच जागेवर सेल्फी घेतली आहे. सेल्फीत तो एकटा दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नाहीये.
3. पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह 1 वाजता बुरुजावरून हटवण्यात आला. सहा तासांच्या एफएसएलपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक पुरावा शोधला, परंतु ही हत्या की आत्महत्या हे कळू शकले नाही. तथापि, पोलिसंनी आता 174 नोंदवून कारवाई केली आहे.
4. थंडीचे दिवस आहेत. टेकडीवर संध्याकाळी 6 वाजताच अंधार पसरतो. संध्याकाळच्या वेळी बुरुजावर फिरायला पर्यटक येत असतात. तरुणांचे टोळके येथे पतंगबाजी करते. रात्री येथे घुप्प अंधार असतो. मग बुरुजाच्या दगडांवर ही आक्षेपार्ह वाक्ये चेतनने केव्हा लिहिली? दिवस मावळण्याआधी इतर कोणी हे लिहिताना पाहू शकले असते आणि अंधारात कोळशाने खडबडीत दगडावर लिहिणे हे पटत नाही.
> मोबाइल टॉर्च लावून लिहिले जाऊ शकते... पण किती, कुठपर्यंत लिहिले असते? त्याने नाही लिहिले तर मग कुणी लिहिले? हे प्रश्न पूर्ण शहरभरात विचारले जात आहेत. तथापि, पोलिस सीसीटीव्ही फुटेज खंगाळत आहेत. जेणेकरून चेतन येथे कसा आला याचा तरी सुगावा लागेल.

 

माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत: नीतू
- मृताची पत्नी नीतू म्हणाली की, मला गुरुवारी संध्याकाळी फोन आला होता. यानंतर परत फोन केला, पण रिसीव्ह केला नाही. ते कधीही तणावात नव्हते. आत्महत्या करूच शकत नाहीत. याची चौकशी झाली पाहिजे.

सोशल मीडियावरून कळले: रामरत्न


कुटुंबीय दु:खात, परिसरात शोककळा
- नातेवाइकांना कळल्यावर ते एकेक करून चेतनच्या घरी पोहोचू लागले. चेतन चार भावांत सर्वात मोठा होता आणि घरातच ज्वेलरीचे काम करत होता.
- चेतन आपल्या कुटुंबासह राहत होता. चेतनला 14 वर्षांची मुलगी कोमल आणि 10 वर्षांचा मुलगा यश सैनी आहेत.
- शेजारचे म्हणतात की, चेतन हा खूप सरळसाधा आणि चांगला होता. चेतनला कोणतेही व्यसन नव्हते.
- चेतन आत्महत्या करू शकतो याच्यावर त्यांचा विश्वासच नाही. गुरुवारी चेतन बाइकवरून मुलांच्या शाळेत गेला.
- मुलांना शाळेतून घरी सोडून तो नाहरगड किल्ल्याकडे गेला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...