जोधपूर - भारतातील राजस्थान हे राज्य अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. येथील प्रत्येक शहराला
आपला एक इतिहास आहे. रहस्यमयी इतिहास कुलधरा गावाला आहे. divyamarathi.com'राजस्थान मालिका' अंतर्गत एक जगावेगळा ऐतिहासिक कथा सांगणार आहोत. ज्यात मुलीची अब्रू वाचवण्यासाठी रात्रीतूनच गाव खाली करावे लागले होते.
कधीकाळी सुख समृध्द असलेले गाव भग्नावशेषात रुपांतरित झाले आहे. आता ते पर्यटन केंद्र बनले आहे. या गावाचे नाव कुलधरा असे आहे. पालीवाल ब्राह्मणांचा आवाज आजही येथे पर्यटकांना ऐकायला येतो. बाजारातील गोंगाटाचा आवाज, महिलांची चर्चा, त्यांच्या बांगड्यांचा आवाज गावातील वातावरण थरारक बनवते.
170 वर्षांपूर्वी कुलधराचे गावकरी आपल्या मुलीची अब्रू वाचवण्यासाठी रात्रीतून गायब झाले होते. असे काय झाले की त्यामुळे लोकांना रात्रीतूनच गाव सोडून दुसरीकडे जावे लागले याचे कोडे सुटलेले नाही. गावचा दिवाण एका मुलीवर प्रेम करत होता हे कारण त्यामागे मानले जाते. पूर्वीसारखीच स्थिती आजही या गावात पाहावयास मिळते.
पॅरानॉर्मल सोसायटीच्या टीमनुसार गावात आत्मांचा वावर
दिल्ली येथील पॅरानॉर्मल सोसायटीच्या टीमने फेब्रूवारी 2014 मध्ये कुलधरा गावाला भेट दिली होती. कुलधरात रात्र काढणे अशक्य आहे. कारण येथे अनेक आत्म्यांचा वावर आहे. ही भीती घालवण्यासाठी सोसायटीच्या 18 सदस्यांबरोबर इतर 10-12 लोक रात्री गावात राहिले होते. टीमकडे एक यंत्र होते. त्याचे नाव 'घोस्ट बॉक्स' असे होते. यात आत्मांचे आवाज नोंदण्यात आली होती. शेवटी दिल्लीच्या पॅरानॉर्मल सोसायटीनुसार कुलधरामध्ये आत्म्याचे निवास आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा पूर्ण घटना...