आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी टीचरला टच करून तो छतावरून पडला; मृत्यूचे गूढ अजुनही कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशांत पांडेय... - Divya Marathi
प्रशांत पांडेय...
वाराणसी - येथे बारावीला शिकणाऱ्या एका मुलाचा छतावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रथमदृष्ट्या याला आत्महत्या म्हटले जात आहे. शाळेने जारी केलेल्या एका पत्रकानुसार, त्याने केजी सेक्शनच्या एका डान्स टीचरची दोनदा छेड काढली होती. त्याची तक्रार सुद्धा संबंधित टीचरने प्रिन्सिपलकडे केली होती. कुप्रसिद्धीच्या भितीनेच त्याने आत्महत्या केली असा दावा शालेय प्रशासनाने केला. मात्र, शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी काही औरच हकीगत सांगितली. तसेच आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे म्हणत कॅन्डल मार्च काढला. त्यामुळे, नेमके प्रकरण काय होते असा सवाल केला जात आहे. 
 

शालेय प्रशासन म्हणे...
- प्रकरण वाराणसी येथील सनबीम वरुणा शाळेचे आहे. येथे गुरुवारी (24 ऑगस्ट) रोजी बारावीत शिकणाऱ्या प्रशांत पांडेय या विद्यार्थ्याचा छतावरून पडून मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी शाळेचे चेअरमन दीपक मधोक यांनी एक पत्रक सोशल मीडियावर जाहीर केले. 
- त्यामध्ये लिहिल्याप्रमाणे, ''सुरभी (काल्पनिक नाव) शाळेतील केजी विभागाच्या डान्स टीचर म्हणून कार्यरत आहेत. घटना घडली त्याच दिवशी प्रशांतने सुरभीला दोनदा टच करून छेड काढली. प्रशांतने पहिल्यांदा टच केले तेव्हा सुरभीला वाटले नकळत झाले असेल. मात्र, प्रशांतने पुन्हा वर्गात जाताना तिला टच केले तेव्हा ती भडकली. 
- तिने याबाबतची तक्रार प्राचार्यांकडे केली. प्राचार्यांनी तिच्याबरोबर वर्गांकडे जात विद्यार्थी कोण होता असे विचारले? तेव्हा सुरभीने प्रशांतकडे बोट दाखवला. त्याच्या जवळ जाऊन त्याचे नाव विचारले, तेव्हा प्रशांतने आपले आयडी कार्ड लपवले आणि घटनास्थळावरून पळ काढला. प्रशांत तर पळून गेला, मात्र त्याचा आयडी सुरभीच्या हाती लागला. सुरभीने जेव्हा त्याला हाका मारल्या तेव्हा येतो-येतो म्हणत तो हॉस्टेलच्या दिशाना पळाला आणि छतावर जाऊन उडी मारली.''
 
 
विद्यार्थी काय म्हणाले?
- चेअरमनचा मेसेज व्हायरल होताच, शेकडो विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळेच्या परिसरात एकवटले. तसेच प्रशांतचा फोटो घेऊन रस्त्यांवर कॅन्डल मार्च काढला. त्यांनी 'वी वॉन्ट जस्टि‍स' अशा घोषणा देखील दिल्या.
- त्यापैकीच एक विद्यार्थिनी मालिनीने सांगितले, ''वर्गातील मुलींना सुद्धा बोलायला तो लाजत होता. तो एका टीचरची छेड काय काढणार!''
- सलोनी म्हणाली, ''अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या विद्यार्थ्यावर अशा प्रकारचे आरोप लावणे मला खटकत आहे. उलट, त्याच्या विरोधात आरोप लावणाऱ्या टीचरचीच चौकशी व्हायला हवी. कदाचित तीच एतर्फी प्रशांतच्या प्रेमात पडली असावी." 
- शाळेत तब्बल सीसीटीव्ही 140 कॅमेरे लावलेले आहेत. त्या सर्व कॅमेऱ्यांचे फुटेज खांगाळून पाहिल्यानंतर कथित छेडछाड आणि आत्महत्या हे दोन्ही प्रकार स्पष्ट होतील असे विद्यार्थी बोलत आहेत.
बातम्या आणखी आहेत...