आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्‍या इतिहास, का होते 84 कोसी परिक्रमा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्‍व हिंदू परिषद आणि उत्तर प्रदेश सरकारमध्‍ये 84 कोसी परिक्रमेवरुन सध्‍या प्रचंड वाद सुरु आहे. सरकारने या परिक्रमेला परवानगी दिली नाही. तसेच उच्‍च न्‍यायालयानेही बंदी उठविण्‍यास नकार दिला आहे. अयोध्येची 84 कोसी परिक्रमा सामान्य माणूस पुत्र प्राप्तीच्या इच्छेतून व साधू-संत मोक्षप्राप्तीसाठी करतात. महंत गयादास यांनी ही माहिती दिली. त्यांचे वय 57 वर्षे आहे. ते म्हणाले 10 वर्षांचा होतो, तेव्हापासून 84 कोसी परिक्रमा करत आलो आहे. भोजन तयार करणे, उपस्थित लोकांमध्ये त्याचे दान करणे व स्वत: खाऊन सर्वांचा निरोप घेणे, अशी परिक्रमेसाठी असलेली अट आहे महाराष्‍ट्र आणि गुजरातमधुन सर्वाधिक भाविक या परिक्रमेसाठी जातात.

बहुतांश जण अपत्‍य प्राप्‍तीच्‍या इच्‍छेसाठी किंवा नवस फेडण्‍यासाठी जातात. साधू-संत मोक्षप्राप्‍तीसाठी परिक्रमा करतात. महंत गयादास यांनी वयाच्‍या दहाव्‍या वर्षांपासून परिक्रमा केली आहे. त्‍यांनी मे महिन्‍यात परिक्रमा पूर्ण केली आहे. त्‍यांनी सांगितले की, शेकडो वर्षांपासून ही परिक्रमा सुरु आहे. राजा दशरथाने त्रेता युगात याच ठिकाणी पुत्रप्राप्‍तीसाठी यज्ञ केला होता. त्‍यानंतर त्‍यांना राम, लक्ष्‍मण, भरत आणि शत्रुघ्‍न ही चार मुले झाली, असे महंत सांगतात.

काय आहे या 84 कोसी परिक्रमेचा इतिहास? जाणून घ्‍या....

या परिक्रमेबाबत ब-याच आख्‍यायिका आहेत. असे सांगतात, की राजा दशरथ पुत्रप्राप्‍ती न झाल्‍यामुळे दुःखी होते. त्‍यामुळे त्‍यांचे गुरु वशिष्‍ठ यांनी त्‍यांना पुत्रेष्‍टी यज्ञ करण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यासाठी श्रृंग मुनींना आमंत्रित केले. ज्‍यावेळी राजा दशरथ यज्ञाची तयारी करत होता, त्‍यावेळी देवता स्‍वर्गात गंभीर मुद्यावर चर्चा करत होते. सर्व देवतांनी भगवान विष्‍णूला प्रार्थना करुन राक्षसांच्‍या विनाशासाठी राजा दशरथाच्‍या पुत्राच्‍या रुपात जन्‍म घ्‍यावा, अशी विनंती केली. त्‍यास भगवान विष्‍णुंनी होकार दिला.

श्रृंगि मुनींनी राजा दशरथ यांना सागितले, की तुम्‍हाला पुत्र व्‍हावा यासाठी अथर्ववेदाच्‍या मंत्रांद्वारे मी पुत्रेष्‍टी यज्ञ करतो. वैदिक पद्धतीने अनुष्‍ठान केल्‍यानतर यज्ञ यशस्‍वी होईल. अशी आख्‍यायिका आहे, की यज्ञ पूर्ण झाल्‍यानंतर यज्ञकुंडातून सुवर्ण पात्रात दिव्‍य खीर घेऊन स्‍वतः प्रजापत्‍य पुरुष प्रकट झाले आणि त्‍यांनी स्‍वर्गातील देवतांचा हा प्रसाद सर्व राण्‍यांना खाऊ घाला.

ही खीर खाल्‍यानंतर तुम्‍हाला चार प्रतापी आणि तेजस्‍वी पुत्रांची प्राप्‍ती होईल. खीर असलेले सुवर्ण पात्र दशरथाने स्विकारले आणि महालात गेला. ज्‍या ठिकाणी यज्ञ झाला त्‍या ठिकाणाला 'मख' म्‍हणतात. या ठिकाणी रामजानकी मंदीर बनलेले आहे. मंदीरात भव्‍य यज्ञकुंड आहे. खीरीचा अर्धा भाग महाराणी कौसल्‍येला दिला. उर्वरित भागातील अर्धा भाग सुमित्र आणि कैकेयीला दिला. सर्वात शेवटी प्रसाद मिळाल्‍यामुळे कैकेयीला राग आला आणि राजा दशरथांना तिने खुप सुनावले.

असे सांगतात, की कैकेयीने प्रसादाचा असा अपमान केल्‍यामुळे भगवान शंकर नाराज झाले आणि त्‍यांनी एका पक्ष्‍याला तिथे पाठविले. या पक्ष्‍याने कैकेयीचा प्रसाद घेऊन अंजन पर्वतावर तपस्‍या करत असलेल्‍या अंजनाला दिला. हा प्रसाद ग्रहण केल्‍यानतर अंजनाने हनुमानाला जन्‍म दिला.

कैकेयीला निराश झाल्‍याचे पाहून कौसल्‍या आणि सुमित्राने स्‍वतःच्‍या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला दिला. त्‍यानंतर तिघी गर्भवती झाल्‍या.

कौसल्‍याने रामाला जन्‍म दिला. सुमित्राने लक्ष्‍मणाला आणि कैकेयीने भरत आणि शत्रुघ्‍न हे पुत्र झाले.

प्रचलित मान्‍यतेनुसार, प्रभू रामाचे साम्राज्‍य 84 कोस क्षेत्रफळात पसरले होते. राजा रामचंद्राच्‍या राज्‍याचे नाव कोशलपूर होते आणि अयाध्‍या राजधानी होती.

या राज्‍याच्‍या क्षेत्रफळावरुनच परिक्रमेचे नाव 84 कोसी परिक्रमा असे पडले.

परिक्रमा सीतापूर जिल्‍ह्यातील नेमिसार येथून सुरु होते. गोण्‍डा, बहराईच, बस्‍ती, बाराबांकी, आंबेडकरनगर या जिल्‍ह्यातून मार्गक्रमण करीत रामनवमीला अयोध्‍येमध्‍ये समारोप होतो.

राजा रामचंद्राच्‍या राज्‍याची 84 कोसी परिक्रमा पूर्ण केल्‍यानंतर भाविकांना मोक्षप्राप्‍ती होते.