आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या मृतदेहात खिळे ठोकले, हातपाय तोडले; झारखंडमध्ये अंधश्रद्धेचा कळस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुमला- झारखंडच्या करंजटोलीमध्ये आई व नवजात बालक अंधश्रद्धेचे बळी ठरले.  उपचाराच्या अभावात बालकाला जन्म दिल्यानंतर झालो उरांइन या २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करायचे सोडून गावकऱ्यांनी तिला भूत घोषित करून शरीराच्या अनेक भागात खिळे ठोकले. त्यानंतर तिचे हातपाय तोडून टाकले.
 
दरम्यान, नवजात बालकाच्या नाकातून रक्त वाहत होते. बालकावर उपचार करायचे सोडून त्याच्या अंगात आईच्या आत्म्याने प्रवेश केल्याचे सांगून गावकऱ्यांनी त्याला रात्रभर आईच्या मृतदेहाजवळच जमिनीवर ठेवले. तो एका प्लास्टिकच्या थैलीत तसाच रात्रभर पडून होता. येथील जिल्हा परिषद अध्यक्ष किरण बाडा यांच्या मते, गावकऱ्यांनी नवजात बालकास विषाक्त दूध प्यायला दिल्याने त्याची तब्येत बिघडली. दुसऱ्या दिवशी किरण गावात पोहोचल्या आणि त्यांनी नवजात बालकास रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला एसएनसीयूमध्ये भरती करून उपचारही सुरू केले. मात्र, बालकाचे प्राण वाचवू शकले नाही. गुरुवारी आई आणि तिच्या नवजात बालकावर सिसईच्या नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले.  

दारिद्र्यामुळे रुग्णालयापर्यंत पोहोचले नाहीत  
शनिचरवा हे पत्नी झालोला दारिद्र्यामुळे रुग्णालयात नेऊ शकले नाहीत. गावात बाळंतपण करू शकणारी महिलाही नव्हती. बुधवारी सायंकाळी सहा वाजता झालोला प्रसवकळा सुरू झाल्या. तिने बालकाला जन्म दिला. तितक्यात शनिचरवा हा बाळंतपण करणाऱ्या महिलेच्या शोधासाठी गावात गेला. परत आल्यानंतर त्याला झालो बेशुद्धावस्थेत दिसली. तिला औषध व उपचाराची गरज होती, पण आर्थिक परिस्थितीमुळे तो काहीच हालचाल करू शकला नाही. दोन तासांनंतर झालोचा मृत्यू झाला आणि गावकऱ्यांनी तिलाच भूत ठरवून टाकले.
 
बातम्या आणखी आहेत...