आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नयनादेवीच्या दर्शनापासून वंचित होऊ नये यासाठी बदलण्यात येतो आरतीचा क्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबच्या सीमेवरील कोलांवाला टोबापासून प्रसिद्ध शक्तिपीठ नयनादेवीपर्यंत सर्वत्र मातेच्या नावाचा जयघोष होत आहे. ‘जय माता दी’च्या घोषणा करताना भाविक परस्परांना अभिवादन करू लागले आहेत. शिवालिक पर्वत रांगेवर हे तिर्थक्षेत्र वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून ३ हजार ५९५ फूट उंचीवर मातेचा हा दरबार आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सरळ चढाई करावी लागते. नयनादेवीमध्ये सामान्य दिवसांत पाच आरत्या होतात. त्यात मंगल आरती, श्रृंगार आरती, माध्यान्ह आरती, सायं आरती व शयन आरतीचा समावेश आहे.

नवरात्रीत भाविकांना दर्शनापासून वंचित व्हावे लागू नये म्हणून व्यवस्थापनाकडून आरतीचा क्रम बदलला जातो. पहिली आरती दुपारी १२ ते साडे १२ दरम्यान व नंतरच्या चार आरत्या रात्री १२ ते २ दरम्यान केल्या जातात. रात्री एकाच वेळी करण्यात येणाऱ्या आरत्या हे भाविकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरते. मातेला याच वेळी प्रसाद अर्पण केला जातो. पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. गुरुवारी हा आकडा ५० हजारांवर पोहोचला. अनेक भाविकांनी दंडवत करत मंदिरात दाखल झाले होते.

भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनाकडून लंगरसह इतर सुमारे अर्धा डझन लंगरची व्यवस्था आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिरात यंदा बायोमेट्रिक सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची संगणकीय सुरक्षा प्रणाली उपलब्ध असलेले हे हिमाचल प्रदेशातील पहिलेच मंदिर आहे.

भक्तच करतात मंदिराची सजावट
नवरात्रीच्या मेळ्यासाठी साजश्रृंगाराची सगळी जबाबदारी मुख्यत्वे नयनामातेचे भाविकच घेतात. १० दिवसीय यात्रेत पाच लाख भाविक मातेचे दर्शन घेतात. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांकडून ९० लाख ते १ कोटी रुपयांची देणगी मिळेल, असा अंदाज आहे. सोने-चांदी व परदेशी पैशांचा यात समावेश नाही.
बातम्या आणखी आहेत...