आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ननवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात चार आरोपींना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - पश्चिम बंगालमधील ननवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील चार संशयित आरोपींना मंगळवारी रात्री उशिरा लुधियाना येथे अटक करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी आरोपींच्या अटकेला दुजोरा दिलेला नाही.

पोलिसांनी सांगितले की, त्यांना लुधियाना शहरात बलात्कार प्रकरणातील चार आरोपी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर आरोपी लपलेल्या परिसरात शोधमोहीम राबवून नाकेबंदी करण्यात आली. आरोपींच्या अटकेपूर्वी बांगलादेश दूतावासाला त्यांची छायाचित्रे पाठवून त्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक केली. पश्चिम बंगालमध्ये नदिया जिल्ह्यात रानाघाटमध्ये चोरट्यांनी ख्रिश्चन शाळेतील ज्येष्ठ ननवर सामूहिक अत्याचार केले होते.
चोरट्यांनी शाळेतील १२ लाख रुपयेदेखील लुटून नेले होते. या प्रकरणात दोन आरोपींना याआधीच प. बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तसेच मानवाधिकार आयोगानेही त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल मागितला होता. तीव्र टीका झाल्यानंतर राज्य सरकारने प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. पण केंद्र सरकारने ती फेटाळली.